JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'बात तो कर लेता यार', सुशांतच्या आठवणीत सर्वात जवळचा मित्र महेश शेट्टीने शेअर केली भावुक पोस्ट

'बात तो कर लेता यार', सुशांतच्या आठवणीत सर्वात जवळचा मित्र महेश शेट्टीने शेअर केली भावुक पोस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर मित्रापेक्षा जास्त भावाचे नातं असणारा त्याचा सर्वात जवळचा मित्र महेश शेट्टी पूर्णपणे कोलमडला आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर महेशने सुशांतसाठी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या जाण्याच्या दु:खातून अजून अनेकांना सावरता आले नाही आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्याचे फोटो, व्हिडीओ अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहेत. दरम्यान त्याच्या नातलगांनी, सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी त्याच्याबद्दल भरभरून लिहिले आहे. मात्र त्याचा सर्वात जवळचा मित्र, ज्याला सुशांतने शेवटचा फोन केला होता त्याची पोस्ट वाचून काळजात चर्रर्र होतं. सुशांत आणि महेश किती जवळचे मित्र होते हे त्या पोस्टमधून स्पष्ट दिसून येतं. अभिनेता महेश शेट्टी (Mahesh Shetty)ला सुशांतने शेवटचा फोन केला होता. मित्रापेक्षा जास्त भावाचे नातं असणाऱ्या सुशांतच्या जाण्याच्या घटनेनंतर महेश पूर्णपणे कोलमडला आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर महेशने सुशांतसाठी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. (हे वाचा- ‘सुशांत नाही तर मी केली असती आत्महत्या’, आणखी एका अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा ) महेशने असं लिहिलं आहे की, ‘ही फीलिंग खूप विचित्र आहे, मला खूप काही सांगायचं आहे पण सांगता येत नाही आहे. तुम्ही आयुष्यात अशा काही व्यक्तींना भेटता ज्यांच्याबरोबर एक जबरदस्त कनेक्शन बनून जातं, जसं की तुम्ही त्यांना पूर्ण आयुष्य ओळखता. भाऊ बनण्यासाठी तु्म्हाला एकाच आईच्या गर्भातून जन्म घेण्याची गरज नसते. असेच आम्ही भेटलो, आम्ही असेच भाऊ होतो. जर आम्ही फिल्मसिटी मध्ये एकत्र जेवण आणि मोठा फेरफटका मारला नसता तर आम्हाला ही बाब कळलीच नसती की कसे आम्ही एकदुसऱ्याच्या आयुष्याचा अभिन्न हिस्सा आहोत.’ (हे वाचा- सुशांतच्या निधनाचं दु:ख पचवणं अवघड; त्याच्या लाडक्या कुत्र्यानेही जेवण सोडलं ) महेशने मोठी पोस्ट लिहत सुशांत्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या गप्पा, मैत्री, चित्रपट, पुस्तकं, विज्ञान आणि अजून बऱ्याच आठणींबद्दल महेशने लिहिले आहे.

महेशने पुढे असे म्हटले की, ‘मी कधी विचार केला नव्हता की तुझ्याबद्दल असं काहीतरी लिहेन. कधी वाटलच नव्हतं तु इतक्या लवकर जाशील. तु एक वारशाच्या रुपाने माझ्या हृदयात राहशील आणि हे कधी मी वाया जाऊ देणार नाही. जर तुम्ही तुमच्या हृदयाचा एक तुकडा गमावलात तर कसं वाटेल? तुला माहित होतं शेट्टी आणि तुझ्याबरोबर कायम राहिल. तरी पण का? बोलायचं तरी होतंस यार. मला माहितेय तुझं ताऱ्यांवर किती प्रेम होतं. मातृभूमीची शप्पथ मी तुला रोज पाहिन.’ महेशचं दु:ख वाटून घेण्यासाठी अनेकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. सुशांतच्या नसण्याने त्याचं दु:ख सर्वांच्या आकलनाबाहेर आहे. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या