मुंबई, 14 ऑगस्ट : नुकत्याच नॅशनल अवॉर्ड जिंकणाऱ्या ‘बधाई हो’ सिनेमातील ‘दादी’ आणि टीव्ही मालिका ‘बालिका वधू’ मध्ये ‘दादी सा’ यांची भूमिका साकारणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी मागच्या दहा महिन्यांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्या नजिकच्या काळात होणत्याही सिनेमात दिसलेल्या नाहीत किंवा त्यानी कोणताही सिनेमा साइन केलेला नाही. तसेच छोट्या पडद्यापासूनही त्या बराच काळ दूर आहेत. मात्र त्याच्या अशाप्रकारे सिनेमांपासून दूर राहण्याचं कारण आता समोर आलं आहे. बऱ्याच काळापासून आजारी असल्यानं सुरेखा यांनी सिनेमांमध्ये काम करत नसल्याचं समजतंय. सुरेखा यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखातीत या गोष्टीचा खुलासा केला. त्या म्हणाल्या, 10 महिन्यापूर्वी मला ब्रेन स्ट्रोक झाल्यानं मी अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. मात्र आता मी यातून सावरत आहे. 10 महिन्यापूर्वी मी बाथरूममध्ये पडले होते. ज्यामुळे माझ्या डोक्याला दुखापत झाली होती. मी त्यावेळी महाबळेश्वरमध्ये शूटिंग करत होते. तब्बेत बिघडत गेल्यानं मी सध्या शूटिंग करू शकत नाही. मात्र डॉक्टरांचं म्हणणं आहे की मी लवकरच ठीक होईल आणि काम करू शकेन. अभिनेत्री नेहा पेंडसे अडकणार लग्नाच्या बेडीत, पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा
काही दिवसांपूर्वीच नॅशनल फिल्म अवॉर्डची घोषणा झाली. ज्यामध्ये ‘बधाई हो’ सिनेमातील भूमिकेसाठी सुरेखा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. याआधी त्यांना तमस (1988) आणि माम्मो (1995) यासिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाल्यानंतर त्या खूप खूश आहेत. VIRAL VIDEO : सोनाक्षीसाठी अक्षय कुमार बनला मेकअपमन! सुरेखा यांना राष्ट्रीय पुरस्काराविषयी तुम्ही सेलिब्रेट करणार नाही का असं विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘सेलिब्रेशन तर हेच आहे की, मी मनापासून आनंदी आहे. मी माझ्या कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला भेटत आहे.’ त्या पुढे म्हणाल्या, सिनेमाची स्क्रीप्ट खूपच सुंदर होती आणि मला वाटतं या सिनेमाला बेस्ट स्क्रिनप्ले अवॉर्ड सुद्धा मिळायला हवा होता. सावत्र मुलीवर अश्लील कमेंट, श्वेता तिवारीच्या पतीची जामिनावर सुटका ==================================================================== VIDEO: ‘माझ्या धन्या, मी दम सोडला पण…’ मनाला चटका लावणारी कविता!