JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO- ‘सुपर ३०’ च्या क्लासमध्ये दिसला हृतिक, म्हणाला उठा, शिका, लढा...

VIDEO- ‘सुपर ३०’ च्या क्लासमध्ये दिसला हृतिक, म्हणाला उठा, शिका, लढा...

हा सिनेमा कंगना रणौतच्या मेंटल है क्या सिनेमासोबत २६ जुलैला प्रदर्शित होणार होता. मात्र हृतिकने कोणत्याही वादात अडकण्यापेक्षा स्वतःच्या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख बदलली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जून- हृतिक रोशनच्या आगामी सुपर ३० सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. यात हृतिक मुलांना शिकवताना दिसत आहे. यात त्याच्या पाठीवर उठा, शिका, लढा, पुढे जा असं लिहिलेलं दिसतंय. हृतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे मोशन पोस्टर प्रदर्शित करून आज सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याचंही सांगितलं. यामुळे त्याच्या चाहत्यांना ट्रेलर रिलीज होण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. फक्त आहिलचा मामाच नाही तर या मुलांचा आजोबाही झालाय सलमान खान या सिनेमात हृतिकने गणित शिकवणारे शिक्षक आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ते दरवर्षी गरीब घरातील पण अभ्यासात हुशार अशा ३० मुलांची निवड करतात आणि त्यांना आयआयटीचं ट्रेनिंग देतात. त्यांना शिकवणी देताना ते त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचाही खर्च उचलतात. ते इतके प्रसिद्ध आहेत की अनेक श्रीमंत घरातील मुलंही त्यांच्याकडे शिकवणी मिळावी म्हणून प्रयत्न करतात.

संबंधित बातम्या

रुग्णालयात भरती झाली सलमान खानची हिरोइन, PHOTO VIRAL हृतिकने जवळपास वर्षभर या सिनेमासाठी काम केलं. तो कौन बनेगा करोडपती १० मध्ये आनंद कुमार यांच्यासोबत खेळायला गेला होता. यावेळी त्याने या सिनेमाबद्दल सर्वांना सांगितले होते. सिनेमात त्याच्यासोबत मृणाल ठाकुरचीही मुख्य भूमिका आहे. येत्या १२ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा कंगना रणौतच्या मेंटल है क्या सिनेमासोबत २६ जुलैला प्रदर्शित होणार होता. मात्र हृतिकने कोणत्याही वादात अडकण्यापेक्षा स्वतःच्या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख बदलली. ‘या’ पाच कारणांमुळे सलमान खानचा भारत होईल हिट SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या