JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / … म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचा फोटो

… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचा फोटो

सनी कधीच तिच्या आई-बाबांचा फोटो पाहत नाही असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं आणि या मागचं कारणही स्पष्ट केलं.

जाहिरात

सनी सांगते, मी त्यावेळी लास वेगासमध्ये माझ्या मैत्रिणीसोबत होते. आम्ही दोघी डॅनिअलच्या बँडमेटला भेटायला जात होतो. त्यावेळी मला कॉमेडियन आणि अभिनेता पॉली शोर सोबत डेटवर जायचं होतं मात्र त्यानं मला फसवलं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 नोव्हेंबर : बॉलिवूडटची बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओनीनं तिच्या करिअरच्या काळात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. एक वेळ होती ज्यावेळी ती टॉप पॉर्न स्टार होती. त्यानंतर नंतर तिनं अडल्ट इंडस्ट्रीला बाय बाय करत बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. मात्र इथला प्रवासही तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. तिला बॉलिवूडमध्ये आल्यावर अनेकांकडून टीका सहान करावी लागली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सनीनं बॉलिवूडमधील तिचं स्थान पक्कं केलं आणि प्रेक्षकांच्या मनात अभिनेत्री म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत सनीनं तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक नवा खुलासा केला. सनी कधीच तिच्या आई-बाबांचे फोटो पाहत नाही असं तिनं या मुलाखतीत सांगितलं आणि यामागचं कारणही तिनं स्पष्ट केलं. OMG! श्रद्धा कपूरनं आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तीला मराठीतून दिल्या शुभेच्छा सनीनं तिचा हा सर्व प्रवास म्हणजे अगदी बालपणापासून ते बॉलिवूड पर्यंत सर्व तिनं तिच्या वेब सीरिजच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवलं आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांनाही ते स्विकारलं. सनीची वेब सीरिज करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी रिलीज झाली आणि सनीचं अवघं आयुष्य उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे सर्वांसमोर आलं. मात्र ही वेब सीरिज करणं सनीसाठी सोपं नव्हतं कारण तिला तिचा भूतकाळ पुन्हा जगायचा होता. पण सनीनं ही वेब सीरिज बनवण्याचा निर्णय घेतला कारण यात फक्त तिच्या अडल्ट करिअरचा उल्लेख नव्हता तर तिचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवला जाणार होता. काजोलसोबत फ्लर्ट करत होता मनिष पॉल, अजय देवगणनं काढली बंदुक आणि…

सनी सांगते, सामान्यपणे तुम्ही कोणाचेही विचार किंवा मतं नाही बदलू शकत. मात्र या वेब सीरिजबाबत मला वाटलं की, यामुळे लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला जाईल. मला ही कल्पना यासाठी आवडली की, याची स्क्रिप्ट खोल होती. म्हणजे त्यात फक्त माझं अडल्ट करिअरच नाही तर आयुष्यातली प्रत्येक घटना मांडली गेली होती. माझं बालपण, माझा संघर्ष, ग्लॅमर, अडल्ट करिअर, लोकांची टीका ते बॉलिवूडपर्यंत सर्व गोष्टी यात सविस्तरपणे मांडल्या होत्या.

सनी पुढे सांगते, या वेब सीरिजचं शूट करत असताना मला भावनिक तापळीवर खूप समस्या आल्या. कारण मी माझ्या आयुष्यातल्या काही कटू आठवणी पुन्हा एकदा जगत होते. तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. ज्यावेळी मी एकाचवेळी माझ्या आयुष्यातले ते क्षण वेगवेगळ्या भूमिकांसोबत शूट करत होते. खरं तर मी माझ्या आई-बाबांचे फोटो पाहत नाही. कारण फोटो पाहिल्यावर मला त्यांची आठवण येते. पण सेटवर त्यांचे फोटो होते. त्यामुळे हे शूट माझ्यासाठी खूप कठीण गेलं. जेव्हा तुम्ही तुमच्या आई-वडीलांनी सांगितलेल्या त्या गोष्टी पुन्हा ऐकता तेव्हा हे तुमच्यासाठी खूप कठीण असतं. मात्र या वेब सीरिजमध्ये सर्व खरं दाखवलं जावं अशी माझी इच्छा होती. काजोलसोबत फ्लर्ट करत होता मनिष पॉल, अजय देवगणनं काढली बंदुक आणि… ========================================================================== परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या