JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Gadar 2 Trailer : 'गदर 2' च्या दमदार ट्रेलरमध्ये सनी देओल दिसला अॅक्शन मोडमध्ये, नादखुळा डायलॉगनं वेधलं लक्ष

Gadar 2 Trailer : 'गदर 2' च्या दमदार ट्रेलरमध्ये सनी देओल दिसला अॅक्शन मोडमध्ये, नादखुळा डायलॉगनं वेधलं लक्ष

Gadar 2 Trailer : नुकताच ‘गदर 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गदर 2’च्या ट्रेलरमध्ये सनी देओलचा जबरदस्त ॲक्शन मोड आणि संवाद लक्ष वेधून घेता आहे.

जाहिरात

गदर 2 पाहण्यासाठी प्रेक्षक अतुर आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै- 2001 मध्ये आलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमा सुपर हिट ठरला. अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या अभिनयानं भरलेला या सिनेमाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सकिना आणि तारा सिंगची प्रेमकथा आता ‘गदर 2’ मधून पाहायला मिळणार आहे. सध्या हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे, चाहत्यांना देखील या सिनेमाबद्दल लहान अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली असून नुकताच ‘गदर 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गदर 2’च्या ट्रेलरमध्ये सनी देओलचा जबरदस्त ॲक्शन मोड आणि संवाद लक्ष वेधून घेता आहे. एका सीनमध्ये तारा सिंग म्हणताना दिसत आहे की, आज पाकिस्तानच्या जनतेला तुम्ही पुन्हा विचारले त्यांना कुठे जायचे आहे… तर अर्ध्याहून जास्त पाकिस्तान खाली होईल आणि तुमच्यापुढे भीक मागायची वेळ येईल, असे एका पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याला उद्देशून बोलताना दिसतो. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना काही नवे कलाकार देखील पाहायला मिळतील. सध्या सगळीकडं याचीच चर्चा आहे. वाचा- कोरोना मग ब्रेनस्ट्रोक-पॅरालिसिसने घेरलं; फॅन फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा ‘गदर 2’च्या ट्रेलरमध्ये सनी देओल पुन्हा एकदा पाकिस्तानला जाणार आहे. पण, यावेळी तो सकिनासाठी जाणार नसून त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी तो बॉर्डर क्रॉस करून थेट पाकिस्तान गाठणार आहे.

पालमपुर, अहमदनगर, लखनऊ सारख्या लोकेशनवर गदर 2चं शुटींग झालं आहे. पालमपुरच्या भलेड गावात सिनेमाच्या शुटींगला सुरूवात झाली. पाकिस्तानमधली सीन शुट करण्यासाठी लखनऊमधील la martiniere collegeमध्ये शुट करण्यात आलं. इथेच सिनेमाचा क्लायमॅक्स देखील शुट करण्यात आला आहे. त्यानंतर सिनेमातील काही सीन्स हे मध्यप्रदेशच्या इंदूर आणि मांडू येथील आहेत.

गदर 2मध्ये तारा सिंग आणि त्याचा मुलगा चरणजीत बाप-लेकाच्या नात्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’मध्ये दाखवण्यात आलेला छोटा जीत म्हणजेच अभिनेता उत्कर्ष शर्माच गदर 2मध्ये त्यांच्या मुलाची भूमिका साकारत आहे. उत्कर्ष आता मोठा झाला असून त्याला पुन्हा जीतच्या भूमिकेत पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या