सुनील शेट्टीचा मुलग्यासोबतच व्हयरल विडिओ पाहून चाहत्यांनी विचारलं फिटनेस सिक्रेट
मुंबई,16 एप्रिल- सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला आपलं आरोग्य आणि फिटनेस जपणं महत्वाचं बनलं आहे. सर्वसामान्य लोकांपासून बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण फिटनेसच्या प्रेमात पडले आहेत. बॉलिवूडमधील नवोदित कलाकार तर सोडाच पण 90 च्या दशकातील गाजलेले अभिनेत्यांमध्येसुद्धा फिटनेसचं वेड दिसून येतं. यामध्ये अनिल कपूरपासून सुनील शेट्टी पर्यंत अनेकांचा समावेश होतो. या कलाकारांना पाहून अनेकांना प्रश्न पडतो की हे खरंच इतक्या वयाचे आहेत? नुकतंच सुनील शेट्टींचा एक व्हिडीओ समोर यामध्ये ते आपला मुलगा अभिनेता अहान शेट्टीसोबत दिसून येत आहेत. सुनील शेट्टी हे बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट देत 90चा काळ गाजवला आहे. सुनील शेट्टी आजसुद्धा तितक्याच ताकतीने पडद्यावर काम करत आहेत. विशेष म्हणजे बदलत्या काळानुसार स्वतःला त्यांनी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सिद्ध केलं आहे.
ते सध्या अनेक चर्चित वेबसीरीजमध्येसुद्धा झळकत आहेत. अनेकांना या सुनील शेट्टींची नव्याने भुरळ पडत आहे. पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटतं कारण सुनील शेट्टी आत्ताही तितकेच तरुण आणि फिट वाटतात. त्यांच्याकडे पाहून अनेकांना वय हा कवेत एक आकडा असल्याचं लक्षात येतं. (हे वाचा: Deepika Padukone: दीपिकाच्या डोळ्याला काय झालं? भूटान ट्रीपमधील तो फोटो पाहून चाहते चिंतेत ) सुनील शेट्टींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी जोरदार लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. शिवाय सुनील शेट्टींचा फिटनेस पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. नुकतंच सुनील शेट्टी आपला मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टीसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. पापाराझींना पोझ देताना अनेकांना बाप कोणता आणि लेक कोणता ओळखणं कठीण झालं होतं. कारण लेकासमोर बापच इतका फिट आणि स्टायलिश दिसत होता की,सर्वच थक्क झाले होते.
या व्हिडीओवर काहींनी कमेंट करत म्हटलंय, ‘यासुनील सर आपल्या मुलापेक्षा जास्त तरुण दिसत आहेत. तर काहींनी लिहलय. मुलापेक्षा वडील जास्त हँडसम दिसत आहेत. तर आणखी एकाने लिहलंय सुनील अण्णासमोर मुलगाही फेल आहे. तर अनेकांनी कमेंट करत सुनील शेट्टींना त्यांच्या फिटनेसचं गुपित विचारलं आहे. सुनील शेट्टी आपल्या फिटनेसवर प्रचंड लक्ष देतात. ते आपल्या खाण्यापिण्यावरही तितक्याच बारकाईने लक्ष देतात. अनेकवेळा सोशल मीडियावर त्यांच्या वर्कआउटचे व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळत असतात. सुनील शेट्टींच्या मुलांबाबत सांगायचं झालं तर, अहान शेट्टी असं त्यांचा मुलाचं नाव आहे. अहान शेट्टीनेसुद्धा वडील आणि बहीण अथियाप्रमाणे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने ‘तड्प’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. परंतु या सिनेमाला फारसं यश मिळालं नव्हतं. अहान शेट्टी तानिया श्रॉफला डेट करत आहे. हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहेत.