मुंबई, 28 फेब्रुवारी- प्रत्येक आई वडिलांना आपली मुली कितीही मोठी झाली तरी ती नेहमी आपल्या जवळ असावीत असतं वाटत असते. पण शिक्षण, नोकरी यासाठी मुलांना घर सोडावं लागतं. मराठामोळ्या अभिनेत्रीची लेक देखील सध्या परदेशात आहे. विशेष म्हणजे आज लेकीचा वाढदिवस आहे, मग अशावेळेस आई वडिलांना आठवण आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच अभिनेत्रीनं लेकीसोबतचा फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री सुकन्या मोने आणि संजय मोने यांची लेक परदेशात आहे. आज त्यांची लेक ज्युलियाचा वाढदिवस आहे.ज्युलिया 21 वर्षांची झाली आहे. मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुकन्या मोने लिहितात..Happy birthday dear Julia आज तू सातासमुद्रापार तुझा 21 वा वाढदिवस साजरा करतेय आहेस….आनंद ह्याचा आहे की तू तिकडे जाऊनही तुझं विश्व,तुझे मित्र मैत्रिणी संग्रही केलेस आणि त्यांच्याबरोबर आजचा दिवस साजरा करते आहेस.खूप खूप शुभेच्छा आणि तुला खूप यश मिळो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना!❤️❤️❤️ वाचा- मराठमोळा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रच्या लग्नाचे PHOTOS पाहिलेत का? मराठी नाट्यरंगभूमीवरील जेष्ठ कलाकारांच्या जोड्यांपैकी एक महत्त्वाची जोडी म्हणजे `संजय मोने आणि सुकन्या कुलकर्णी-मोने’. मराठी नाटकांमध्ये संजय मोने हे साधारण वीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्या करियरचा प्रवास शाळा आणि महाविद्यालयापासून झाला. बालमोहन विद्यामंदिर ही शाळा आणि रुपारेल काॅलेज असा काॅम्बो असल्यामुळे त्यांचा अभिनयाशी संबंध हा लहान वयामध्येच जोडला गेला. `प्रेमासाठी वाट्टेल ते’ या मराठी चित्रपटामधून त्यांनी सिनेक्षेत्रामध्ये पदार्पण केले. अनेक चांगल्या सिनेमांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. `सरफरोश’ या हिंदी सिनेमामध्ये त्या आमिर खानसोबत झळकल्या. `व्हेंटिलेटर’ आणि `ती सध्या काय करते’ या सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या. `ब्योमकेश बक्षी’ या हिंदी मालिकेच्या मार्फत त्या पहिल्यांदा टेलिव्हिजनवर झळकल्या.
मराठी मालिका विश्वाच्या सुवर्णकाळाच्या सुकन्या मोने साक्षीदार आहेत. त्यानंतर सुकन्या कुलकर्णी-मोने या `आभाळमाया’, `वादळवाट’, `कळत नकळत’, `एका लग्नाची दुसरी गोष्ट’, `चुक भूल द्यावी घ्यावी’ अशा दर्जेदार मालिकांच्या त्या महत्त्वपूर्ण भाग होत्या. सुकन्या यांनी नाट्य क्षेत्रामध्येसुद्धा काम केलेले आहे.