JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / श्रुती हसन बॉयफ्रेंड शंतनूसोबत कधी करणार लग्न? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

श्रुती हसन बॉयफ्रेंड शंतनूसोबत कधी करणार लग्न? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

गेल्या दोन वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत लग्नसराई सुरु आहे. कतरिना-विकी पासून आलिया रणबीर पर्यंत (Katrina-Vicky To Alia-Ranbir) आणि आता नयनतारा-विघ्नेश पर्यंत अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. तसेच असेही काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या रिलेशनशिपबाबत उघड उघड सांगितलं आहे. यातीलच एक नाव म्हणजे साऊथ-बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) होय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,30 जून-   गेल्या दोन वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत लग्नसराई सुरु आहे. कतरिना-विकी पासून आलिया रणबीर पर्यंत  (Katrina-Vicky To Alia-Ranbir)  आणि आता नयनतारा-विघ्नेश पर्यंत अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. तसेच असेही काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या रिलेशनशिपबाबत उघड उघड सांगितलं आहे. यातीलच एक नाव म्हणजे साऊथ-बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) होय. श्रुती हसन हे गेल्या काही वर्षांत साऊथ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनलं आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता कमल हसन आणि अभिनेत्री सारिका यांची लेक असूनसुद्धा श्रुतीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या ती अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. या सगळ्यामध्ये ती शंतनू हजारिकासोबतच्या नात्यामुळेसुद्धा चर्चेत आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीला तिच्या वेडिंग प्लॅनबाबत विचारण्यात आलं होतं. यावेळी उत्तर देताना श्रुतीने यासंदर्भात आपल्याडे सध्या कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. ETimes शी साधलेल्या संवादात, श्रुती म्हणते- ‘हे असं काहीच नाहीय ज्यामध्ये मी लगेच उडी मारेन.’ तथापि, श्रुतीला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्याची ही पहिलीच वेळ नाही. शिवाय अभिनेत्रीनेसुद्धा यावर अनेकवेळा आपलं एकसारखं मत व्यक्त केलं आहे.

**(हे वाचा:** Bigg Boss फेम निक्की तांबोळीने खरेदी केली नवी Mercedes Benz; किंमत ऐकून व्हाल थक्क ) याबाबत बोलताना श्रुती पुढे म्हणते की, लग्नाबद्दलच्या तिच्या विचारांवर तिच्या पालकांचाही प्रभाव आहे. जे आता घटस्फोटित आहेत (कमल हसन आणि सारिका). ती म्हणते- ‘त्यांचं लग्न भलेही न टिको पण आपण लग्नाचा विचार अद्यापतरी त्यागलेला नाहीय. कारण ते एके काळी एक अद्भुत जोडपं होतं आणि मी या गोष्टीवर माझं लक्ष केंद्रित केलं आहे’’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या