JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Nayanthara-Vignesh Shivan Wedding: साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री नयनतारा अडकली लग्नबंधनात,समोर आला First फोटो

Nayanthara-Vignesh Shivan Wedding: साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री नयनतारा अडकली लग्नबंधनात,समोर आला First फोटो

बॉलिवूडसोबतच आता साऊथ इंडस्ट्रीमध्येसुद्धा (South Actress) लग्नसराई सुरु आहे. आदी पिनशेट्टीनंतर आता साऊथ अभिनेत्री नयनताराने (Nayanthara) आपला फिल्ममेकर बॉयफ्रेंड विघ्नेश शिवनसोबत (Vighnesh Shivan) लग्नगाठ (Wedding) बांधली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जून-   बॉलिवूडसोबतच आता साऊथ इंडस्ट्रीमध्येसुद्धा   (South Actress)  लग्नसराई सुरु आहे. आदी पिनशेट्टीनंतर आता साऊथ अभिनेत्री नयनताराने   (Nayanthara) फिल्ममेकर बॉयफ्रेंड विघ्नेश शिवनसोबत  (Vighnesh Shivan) लग्नगाठ (Wedding)  बांधली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची उत्सुकता होती. आज अखेर या जोडप्याने लग्नगाठ बांधत सर्वानांच सुखद धक्का दिला आहे. साऊथ चित्रपटसृष्टीमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून नयनताराला ओळखलं जातं. या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते सतत तिच्या लहान-लहान गोष्टींवर लक्ष ठेऊन असतात. अभिनेत्री आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत असते. आज अभिनेत्रीने लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

नयनतारा विघ्नेश शिवन आता अधिकृतपणे विवाहबद्ध झाले आहेत. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. या दोघांनी चेन्नईमध्ये लग्नगाठ बांधली आहे. या लग्नात शाहरुख खान, ऍटली, रजनीकांत, अजित कुमार, बोनी कपूर आणि विजय सेतुपती यांच्यासह अनेकांनी उपस्थितलावली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या