नागा शौर्य
मुंबई, 2 मार्च- सध्या सगळीकडे साऊथ अभिनेत्यांची चांगलीच हवा आहे. बॉक्स ऑफिसपासून ते पुरस्कार सोहळ्यांमध्ये सर्वत्र साऊथ कलाकार जोरदार कामगिरी करत आहेत. दरम्यान हे कलाकार आपल्या साध्या स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. हे कलाकार सतत काही ना काही सामाजिक कार्य आणि भारतीय संस्कृतीचा जीवापाड आदर करत सर्वांनाच भुरळ पाडत आहेत. दरम्यान आणखी एका साऊथ अभिनेत्याचं लोक कौतुक करत आहेत. आणि त्याला रिअल हिरो म्हणून संबोधत आहेत. पाहूया कोण आहे हा अभिनेता. आपण साऊथ स्टार नागा शौर्याबद्दल बोलत आहोत.सध्या हा तेलुगु स्टार त्याच्या आगामी ‘फलाना अब्बाई फलाना अम्माई’ या चित्रपटासाठी तयारी करत आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच नेटकऱ्यांकडून त्याचं रिअल हिरो म्हणून कौतुक होत आहे. यामागचं कारणही तितकंच खास आहे. सध्या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. (हे वाचा: 25व्या वर्षीच मृत्यू,अभिनेता-बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; Jiah Khan प्रकरणाची सीबीआय कोर्टात सुनावणी सुरु ) काही नेटकऱ्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये साऊथ अभिनेता नागा शौर्य रस्त्यावर लोकांच्या घोळक्यात उभा असलेला दिसून येत आहे. नीट पाहिलं तर समजतं की, एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला रस्त्यावरच मारहाण करत आहे, हा प्रकार पाहून अभिनेता मध्ये पडतो आणि त्या तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान अभिनेता त्या तरुणाला गर्लफ्रेंडची माफी मागायला सांगतो. हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नागा शौर्य एका तरुणाचा हात धरून त्याला त्याच्या सोबत असणाऱ्या तरुणीची माफी मागायला सांगत आहे. अभिनेता त्या तरुणाला म्हणाला, तिला सॉरी म्हण.’ यावर उत्तर देत त्या तरुणाने म्हटलं ती माझी गर्लफ्रेंड आहे.
त्या तरुणाच्या बोलण्याची पर्वा न करता शौर्य त्याला माफी मागायला सांगत राहिला. अभिनेता त्याला म्हणाला, ती तुझी गर्लफ्रेंड असू शकते. पण तू तिला भर रस्त्यातच कसा मारु शकतोस? ती तुझी गर्लफ्रेंड आहे, याचा अर्थ असा नाही की, तू तिच्यासोबत असा गैरव्यवहार करणार. हे साफ चुकीचं आहे. असं म्हणत अभिनेत्याने त्या तरुणीसाठी भर रस्त्यात पंगा घेतला आहे. त्यामुळे अभिनेत्याचं सध्या प्रचंड कौतुक होत आहे.