JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सोनू सूदनंतर आता अमिताभ बच्चन यूपीच्या मजूरांना करणार मदत, असा आहे प्लान

सोनू सूदनंतर आता अमिताभ बच्चन यूपीच्या मजूरांना करणार मदत, असा आहे प्लान

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करत आहे. त्यानंतर आता बिग बी अमिताभ बच्चन हे सुद्धा यूपीच्या मजूरांच्या मदतीला आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 मे : कोरोना व्हायरसनं सध्या संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. देशात सुद्धा या व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी 31 मे पर्यंत लॉकडाऊन केलं आहे. ज्यामुळे परराज्यातील अनेक मजूर मुंबईमध्ये अडकले आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणतंच काम नसल्यानं पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा सर्वांना सध्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करत आहे. त्यानंतर आता बिग बी अमिताभ बच्चन हे सुद्धा यूपीच्या मजूरांच्या मदतीला आले आहेत. या मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी अमिताभ बच्चन सुद्धा मदत करणार आहेत. कोरोना व्हायरस दरम्यानं अनेक बॉलिवूड कलाकार मदत करताना दिसत आहेत. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची टीम सुद्धा यावर काम करत आहे. फुड पॅकेट्स, ड्राय फुड्स, पाण्याच्या बॉटल, चप्पल अशा काही वस्तू प्रवासी मजूरांना वाटल्या जात आहेत. यासोबतच अमिताभ बच्चन यांची टीम अनेक प्रवासी मजूरांनी मुंबईतून उत्तर प्रदेशला पोहचवण्यासाठी सतत कार्यरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही टीम 28 मे ला हाजी अली वरून यूपसाठी 10 पेक्षा जास्त बस पाठवणार आहेत.

याशिवाय अमिताभ बच्चन कोरोना वॉरिअर्सना सुद्धा मदत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी 20 हजार पीपीई किट्स आमि फुड पॅकेट्स वाटली आहेत. अमिताभ बच्चन अनेक सरकार योजनांसोबतही काम करत आहे. ज्यातून लोकांमध्ये या व्हायरसबाबत जागरुकता निर्माण केली जाईल. सातत्यानं ते चाहत्यांना सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देत आहेत. राम गोपाल वर्मानं COVID-19 वर तयार केला पहिला सिनेमा, पाहा Coronavirus Trailer ‘भाग्यश्रीला पकड आणि KISS कर…’ फोटोग्राफरनं सलमानला सांगितलं, पण…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या