JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sonam Kapoor: सोनम कपूरच्या बाळाचं नाव आलं समोर, VIDEO मुळे झाला खुलासा

Sonam Kapoor: सोनम कपूरच्या बाळाचं नाव आलं समोर, VIDEO मुळे झाला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांपूर्वी एका गोंडस लेकाला जन्म दिला आहे. सोनमने 20 ऑगस्ट रोजी ही गुड न्यूज दिली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑगस्ट-   बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांपूर्वी एका गोंडस लेकाला जन्म दिला आहे. सोनमने 20 ऑगस्ट रोजी ही गुड न्यूज दिली होती. आईबाबा बनल्यानंतर सोनम आणि आनंद अहुजा प्रचंड आनंदी आहेत. ते सतत सोशल मीडियावरुन आपला आनंद व्यक्त करत आहेत. सोनम आणि आनंद यांनी अद्याप त्यांच्या मुलाचं नाव उघड केलेलं नाही. मात्र, सोनमची बहीण रिया कपूरने बाळाचं टोपण नाव उघड केलं होतं. मावशी रिया सोनमच्या बाळाला सिम्बा म्हणून हाक मारते. मात्र आता बाळाचं नाव समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे सोनमच्या बाळाचं नाव समोर आलं आहे. अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या नवजात बाळासाठी कस्टमाईज्ड ब्लँकेट आणि कपडे बनवले होते. ज्यावर बाळाचं नाव लिहिलं होतं. यावर बाळाचं नाव बेबी ‘के आहुजा’ असं आहे. त्यामुळे बरेच लोक अंदाज लावत आहेत की सोनमने तिच्या मुलाचं नाव ठेवलं आहे. सोनम आणि आनंद अहुजाने ‘के’ अक्षरावरून आपल्या लेकाचं नाव ठेवलं आहे. सोनमला भेट देणाऱ्या एका किड्स ब्रँडने आपल्या एका व्हिडिओ पोस्टमध्ये त्या भेटवस्तूची एक झलकही दाखवली आहे ज्यावर ‘बेबी के अहुजा’ असं लिहण्यात आलं आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत या किड्स ब्रँडने लिहलंय, “आम्ही सोनम कपूरला तिच्या आयुष्यातील या नवीन प्रवासात शुभेच्छा देतो आणि त्यातील एक छोटासा भाग म्हणून आम्ही आनंदी आहोत.“शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की त्यामध्ये काही लहान मुलांचे कपडे आणि इतर प्रॉड्क्टस आहेत. काही कपड्यांवर ‘अहुजा’ लिहिलेलं आहे तर एका आउटफिटवर ‘बेबी के आहुजा’ लिहिलेलं दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

(हे वाचा: सारा तेंडुलकरसोबत ब्रेकअपनंतर शुभमन गिलच्या लाईफमध्ये ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री; डिनर डेटचा फोटो VIRAL **)** सोनम कपूरने डिलिव्हरीपूर्वी व्होगला एक मुलाखत दिली होती. यामध्ये तिने आई बनल्यानंतर आपलं आयुष्य कसं बदलणार याबाबत सांगितलं होतं. बॉलिवूडमध्ये कमबॅकबाबत ती म्हणाली, “प्रसूतीनंतर हे सर्व काही बदलणार आहे. आता या जोडप्याचं प्राधान्य त्यांच्या नवजात बाळाकडे वळलं आहे. सोनमने नुकतंच फेय डिसूझासोबतच्या संवादात सांगितलं होतं की, आता तिची कारकीर्द पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. ती म्हणाली की तिला आता सतत चित्रपटांमागे धावता येणार नाही’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या