मुंबई, 26 ऑगस्ट: भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. सध्या सुरू असलेल्या एकाहून एक खुलास्यानंतर सोनाली यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता हे समोर आलं आहे. दरम्यान गोवा पोलिसांनी सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांना अटक केली असून दोघांनी सोनाली यांना ड्रग्ज दिल्याची कबूली दिली आहे. मृत्यूच्या रात्री सोनाली याच दोघांबरोबर गोव्याच्या क्लबमध्ये पार्टी करत होत्या. गोव्याच्या त्या पार्टीतील सोनाली यांचा सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला असून व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली या ड्रग्जच्या नशेत असल्याचं दिसत आहे. त्यांची हालत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोव्याच्या क्लबमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली यांचा मित्र सुखविंदर त्यांना घेऊन लेडीज वॉशरुमच्या दिशेने जात आहे. सोनाली यांना धड चालणंही कठीण झालं होतं. त्यांना ड्रग्जचा ओव्हर डोस झाल्याचं यात दिसून येत आहे. इतकंच नाही तर त्यांच्या अंगावरचे कपडे देखील विचित्र स्थितीत पाहायला मिळत आहेत. क्लब मधील हे सीसीटीव्ही फुटेज 22 ऑगस्टच्या पहाटे 4:30 वाजताचं आहे. सोनाली यांना बाथरुममध्ये नेल्यानंतर त्या 2 तास बाथरुममध्येच होत्या असा खुलासा गोवा पोलिसांनी केला आहे.
सोनाली फोगट यांचा मृत्यू संशायस्पद असून सोनालीचा खून झाल्याचा दावा त्यांच्या भावाने केला होता. त्यानुसार तक्रार दाखल केल्यानंतर गोवा पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी सोनाली यांना जबरदस्तीनं ड्रग्ज दिल्याचं कबूल केलं. त्यानंतर गोवा पोलिसांनी क्लबमधी सीसीटीव्ही फुटेच चेक केल्यानंतर खळबळजनक खुलासे केले. हेही वाचा - Sonali Phogat Death : मृत्यूआधी सोनाली फोगटचा क्लबमधील VIDEO व्हायरल; पीए सुधीर सांगवानबरोबर डान्स करताना दिसतेय अभिनेत्री गोवा पोलिसांनी केलेल्या खुलास्यामध्ये त्यांनी म्हटलंय, सोनाली यांना ड्रग्ज दिल्यानंतर काही वेळात त्यांनी स्वत:वरचा कंट्रोल गमावला. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास जेव्हा सोनाली स्वत:ला सांभाळू शकत नव्हत्या तेव्हा दोघे त्यांना बाथरुमच्या दिशेने घेऊन जाताना दिसत आहेत. त्या जवळपास 2 तास बाथरुममध्ये होत्या. बाथरुममध्ये दोघांनी सोनाली यांच्याबरोबर काय केलं याचं स्पष्टीकरण अद्याप आरोपींनी दिलेलं नाही. हेही वाचा - Sonali Phogat Death Case: सोनाली फोगट मृत्यूप्रकरणात धक्कादायत कबुली, संशयित आरोपींनी अभिनेत्रीला पाजलं होतं विष, पाहा VIDEO सोनाली फोगट यांच्या शरीरावर काही बोथट जखमांच्या खुणा आढळल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं. आरोपींनी दिलेल्या कबुलीत त्यांनी सोनाली यांचा मृतदेह उचलताना त्यांच्या शरीरावर या जखमा झाल्याचं म्हटलं आहे.