मुंबई, 26 ऑगस्ट: अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांना संशयास्पद आरोपी म्हणून गोवा पोलिसांनी अटक केली आहे. सोनाली यांचा मृत्यू झाला त्या रात्री सोनाली यांच्याबरोबर दोघेही क्लबमध्ये पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे. त्याच पार्टीत दोघांनी जबरदस्तीनं सोनाली यांना ड्रग्ज दिलं अशी कबुली देखील गोवा पोलिसांना दिली. दरम्यान सोनाली आणि दोन्ही संशयित आरोपींचा क्लब पार्टीतील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात क्लबमध्ये सोनाली फोगट त्यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. सोनाली डान्स करताना काहीश अनकम्बफर्टेबलही दिसत आहेत. हा व्हिडीओ सोनाली यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्रीचा असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने तिच्या मृत्यूसंदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती. सोनालीचा मृत्यू हा किरकोळ नसून, ते कटकारस्थान आहे, अशी तक्रार दाखल केली होती. सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीला जाळ्यात अडकवलं. सोनाली वर्षानुवर्षं सुरू असलेला बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि स्लो पॉयझनिंगची बळी ठरली आहे, असं तक्रारीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर गोवा पोलिसांनी पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांना संशयित आरोपी म्हणून अटक केली.
हेही वाचा - Sonali Phogat: सोनालीच्या मृत्यूनंतर अशी झालीये लेकीची अवस्था; रडून-रडून आईसाठी मागतेय न्याय सोनाली फोगट मृत्यूच्या आदल्या रात्री ज्या क्लबमध्ये पार्टी करत होत्या तिथलं सीसीटीव्ह फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून गोवा पोलिसांनी मोठा खुलासा केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगट यांच्याबरोबर दोन्ही संशयित आरोपीपीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर पार्टी करताना दिसत आहे. दोघे सोनालीला जबरदस्ती काही तरी पाजण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिवस आहे. त्यानंतर दोघांनी सोनाली यांच्या ड्रिंक्समध्ये ड्रग मिसळून त्यांना जबरदस्ती पाजलं. सोनाली यांना ड्रग्जचा ओव्हर डोस झाल्याचं गोवा पोलिसांनी म्हटलं आहे.