JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sonalee Kulkarni : 'हिरकणी' नंतर सोनाली कुलकर्णी पुन्हा साकारणार ऐतिहासिक भूमिका; चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

Sonalee Kulkarni : 'हिरकणी' नंतर सोनाली कुलकर्णी पुन्हा साकारणार ऐतिहासिक भूमिका; चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

सोनालीची हिरकणी चित्रपटातील भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तिचे या भूमिकेसाठी सर्वत्र कौतुक झाले होते. तिला ‘हिरकणी’ साठी अनेक पुरस्कारही मिळाले होते. या भूमिकेनंतर सोनाली पुन्हा त्याच धाटणीची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे.

जाहिरात

Sonalee kulkarni as maharani tarabai

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट - अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सोनालीने आतापर्यँत विविध भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. आता सोनाली नव्या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष नम्हणजे हा एक ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. ‘हिरकणी’ चित्रपटातील ऐतिहासिक je: नुकतंच या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त पार पडला. सोनालीच्या आगामी चित्रपटाचं नाव  ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ असं असून नुकताच  चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्लॅनेट मराठी घेऊन येत आहे. प्लॅनेट मराठी एका पाठोपाठ सिनेमे घेऊन येत आहे. त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. आता प्लॅनेट मराठीच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत माहिती देण्यात आली आहे. ‘औरंगजेब सारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या बलाढ्य मोगल दिल्लीपती पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा झोपवणा-या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न!‘असं कॅप्शन देत या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई. त्यांच्याच जीवनावर आधारीत ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा साकारणार आहे.  शिवाय चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं आहे. मुंबईमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. या चित्रपटासाठी चित्रनगरीमध्ये भव्य सेट उभारला गेला आहे. हेही वाचा - Abhidnya Bhave : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीपासून अभिज्ञाच्या संसाराला धोका; अभिज्ञाने केला खुलासा ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘मंत्रा व्हिजन’ निर्मित हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या “मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई” या ग्रंथावर आधारीत आहे. या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सोनालीची हिरकणी चित्रपटातील भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तिचे या भूमिकेसाठी सर्वत्र कौतुक झाले होते. तिला ‘हिरकणी’ साठी अनेक पुरस्कारही मिळाले होते. त्यामुळे तिला आता पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या