स्मृती ईरानी
मुंबई, 10 फेब्रुवारी- केंद्रीय मंत्री आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री
स्मृती ईरानी
सध्या प्रचंड चर्चेत आहेत. स्मृती ईरानी आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. स्मृती ईरानींची मुलगी शनेल ईरानी नुकतंच लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर काल राजस्थानमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्मृती ईरानी यांची कन्या शनेल ईरानी काल राजीव भल्लासोबत लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील, नागौर याठिकाणी असलेल्या खिंवसर किल्ल्यात हे शाही लग्न पार पडलं. सध्या अनेक सेलिब्रेटी राजस्थानच्या शाही किल्यांमध्ये लग्न करण्याला पसंती देत असल्याचं दिसून येत आहे. गेल्यावर्षी अभिनेत्री कतरिना कैफने अशाच राजस्थानमधील एका प्रसिद्ध शाही पॅलेसमध्ये लग्न केलं होतं. तर नुकतंच कियारा अडवाणीनेसुद्धा असंच केलं आहे. कियारा राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नाच्याबेडीत अडकली आहे. आता स्मृती ईरानीच्या लेकीचं लग्नदेखील अशाच शाही पॅलेसमध्ये पार पडलं आहे.
Valentine’s Day 2023: ‘व्हॅलेंटाइन्स डे’पूर्वी कपिल शर्माचं चाहत्यांना सरप्राईज;गुरु रंधावासोबत कॉमेडियनचं पहिलं गाणं रिलीज शनेल आणि अर्जुन यांच्या या शाही लग्नात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत पारंपरिक राजस्थानी अंदाजात करण्यात आलं. यावेळी पॅलेसच्या बाहेर जोरदार आतिषबाजीदेखील करण्यात आली. शिवाय या लग्नामध्ये पॅलेसबाहेर अनेक विंटेज कार दिसून आल्या. ज्याची सध्या मोठी चर्चा होताना दिसून येत आहे. या हायप्रोफाईल लग्नात इतर सेलिब्रेटींप्रमाणे ‘नो फोन पॉलिसी’ लागू करण्यात आली होती. त्यामुळे लग्न मंडपात उपस्थित असलेल्या कोणत्याच पाहुण्यांना फोन वापरण्याची परवानगी नव्हती. शिवाय लग्नात मोठा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्मृती ईरानी यांच्या मुलीच्या या
शाही लग्नात
कोणताही व्हीआयपी पाहुणा उपस्थित नव्हता. अवघ्या ७० लोकांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला.
शनेल आणि अर्जुनने2021 मध्ये साखरपुडा उरकला होता. स्मृती ईरानी यांनी आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती. त्यांनतर आता या दोघांनी लग्नगाठ बांधत सर्वांना खुश केलं आहे.