JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Video : 'आजही तो दिवस ठळकपणे आठवतो...' गायिका प्रियांका बर्वेनीं सांगितला 'चंद्रमुखी'चा ज्वलंत अनुभव

Video : 'आजही तो दिवस ठळकपणे आठवतो...' गायिका प्रियांका बर्वेनीं सांगितला 'चंद्रमुखी'चा ज्वलंत अनुभव

चंद्रमुखी सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांच्या तडफदार लावणी नृत्याची झलक सवाल- जवाबात(Sawal Jawab Song ) पाहायला मिळत आहे. पण ही लावणी गाताना पडद्यामागे गायिकेला कशाप्रकारे मेहनत घ्यावी लागली याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मे- अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी**’ (Chandramukhi )** हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडल्याचं दिसून येत आहे. 29 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 4 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपाटील गाणी (Chandramukhi Song) देखील सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांच्या तडफदार लावणी नृत्याची झलक सवाल- जवाबात**(Sawal Jawab Song )** पाहायला मिळत आहे. पण ही लावणी गाताना पडद्यामागे गायिकेला कशाप्रकारे मेहनत घ्यावी लागली याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एक कलाकृती सर्वांसमोर घेऊन येण्यापूर्वी त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याचे दर्शन यातून होते. मधुरा दातार आणि प्रियांका बर्वे   ( priyanka barve ) यांनी ही सवाल- जवाब लावणी गायली असून, साथीदारांनीही त्यांना सुरेख साथ दिली आहे. गायिका प्रियांका बर्वे यांनी याचा पडद्यामागचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिड़िओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, मला आजही हा दिवस अगदी ठळकपणे आठवतो. हा माझा आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात खास आणि संस्मरणीय असा अनुभव आहे. तिची ही पोस्ट तर चर्चेत आहेच पण तिच्या गाण्याच्या शैलीचे देखील चाहत्यांकडून कौतुक होत आहे. वाचा- शिवानी-विराजसचं दणक्यात पार पडलं रिसेप्शन, या कलाकारांनी लावली हजेरी! प्रियांका यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये संगीतकार अजय गोगवले तसेच गुरू ठाकूर देखील दिसत आहेत. एकादं गाणं पडद्यावर आणण्यासाठी पडद्यामागे किती मेहनत घ्यावी लागते याचे दर्शन यातून होते. एक कलाकृतीमागे अनेक हात राबत असल्याचा प्रत्यय यातून येतो.

संबंधित बातम्या

फडावर लावणी सुरु असताना एकमेकिंसमोर उभ्या असणाऱ्या लावण्यवती कशा प्रकारे एकमेकिंना सवाल जवाबाच गुंतवतात आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यातील प्रसंगांचे संदर्भ देत कशी ही कला सादर करतात याची सुरेख झलक यातून दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांच्या तडफदार लावणी नृत्याची झलक या सवाल- जवाबात पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांकडू या सिनेमातील गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर चंद्रमुखी सिनेमातील गाण्यातील प्रचंड क्रेझ पाहायला मिळते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या