JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 42 दिवस लेकापासून दूर राहिली गायिका; दौऱ्याहून परत येताच झाली भावूक, Video

42 दिवस लेकापासून दूर राहिली गायिका; दौऱ्याहून परत येताच झाली भावूक, Video

गायिका आपल्या कार्यक्रमांच्या दौऱ्यासाठी 40हून अधिक दिवस आपल्या चिमुकल्या मुलापासून दूर राहिली. भारतात येताच ती प्रचंड भावूक झाली.

जाहिरात

प्रियांका बर्वे भारतात परतली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जुलै : कलाकारांना अनेकदा कामासाठी लांब लांबच्या दौऱ्यांवर जावं लागतं. दुसऱ्या जिल्ह्यात जरी कार्यक्रम असला तरी त्यासाठी कलाकारांना आपलं कुटुंब, मुलं सगळं सांभाळून जावं लागतं. पण जर तो दौरा परदेशात असेल तर मात्र खूपच अवघड होऊन जातं. मराठी सिनेसृष्टीतील अशीच एक गायिका आपल्या कार्यक्रमांच्या दौऱ्यासाठी 40हून अधिक दिवस आपल्या चिमुकल्या मुलापासून दूर राहिली. एकीकडे कार्यक्रम करत असताना दुसरीकडे आपला मुलगा आणि कुटुंबाला ती प्रचंड मिस करत होती. पण अखेर ती भारतात परत आली असून परत येताच आपल्या मुलाला भेटून ती अत्यंत भावूक झाली. कार्यक्रमासाठी US दौऱ्यावर गेलेली गायिका दुसरी तिसरी कोणी नसून प्रियांका बर्वे आहे.  प्रियांका मुघल-ए-आझाम नाटकाच्या प्रयोगांसाठी USला गेली होती. तब्बल 42 दिवस ती US दौऱ्यावर गेली होती. आपल्या चिमुकल्या मुलाला घरी सोडून प्रियांका दौऱ्यासाठी गेली होती. प्रियांकाचा मुलगा युवान हा फारच लहान आहे. त्याने देखील काही दिवस आईशिवाय राहण्याची सवय केली होती. पण 42 दिवसांनी आई समोर दिसताच युवाननं देखील तिच्याकडे धाव घेत तिला कडकडून मिठी मारली. हेही वाचा -  निवेदिता यांच्या त्या कृतीने अशोक मामांना मिळाली होती त्यांच्या प्रेमाची कबूली, कपलच्या लव्ह-स्टोरीचा रोमँटिक किस्सा

गायिका प्रियांका बर्वेनं भारतात परत येताच तिला एअरपोर्टवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात प्रियांका फॅमिली तिला एअरपोर्टवर घेण्यासाठी आली आहे. धावत पळत आपल्या मुलाला भेटण्यासाठी कासावीस झालेल्या प्रियांकाला तिचा लेक दिसताच तिनं त्याला उचलून मिठी मारली. मलाच खरं वाटत नाहीये असं म्हणत प्रियांका भावूक झाली. मायलेकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

संबंधित बातम्या

प्रियांका हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय,  “मुघल-ए-आझमच्या फॅब्युलस शोनंतर 42 दिवसांनी पुन्हा भारतात आलेय. अशाप्रकारे माझा US दौरा छान पार पडला.  माझ्या मुलाचा मला खूप अभिमान आहे. या संपूर्ण काळात तो मला मोटिवेट करत राहिला. माझ्या फॅमिलीमुळे हे सगळं शक्य झालं याचा मला खूप आनंद आहे. त्यांच्याशिवाय हे काहीच शक्य नव्हतं”. मुघल-ए-आझम या भव्य प्रयोगात प्रियांका बर्वे ही अनारकलीची भूमिका साकारत आहे. एकीकडे गायन आणि दुसरीकडे प्रियांका दमदार अभिनय देखील पाहायला मिळतोय. मुघल-ए-आझमसाठी गायक आणि डान्सर्सची मोठी टीम US दौऱ्यावर गेली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या