मुंबई, 20 मार्च : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. देशात वेगानं पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचे उत्तर प्रदेशमध्ये कनिकासह आणि 4 रुग्ण सापडले आहेत. पण कनिकाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर तिला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावरुन होत आहे. कारण लंडनवरुन परतल्यानंतर तिनं एक पार्टी केली होती. ज्यामुळे तिच्यावर कोरोना पसरवल्याचा आरोप केला जात आहे. बॉलिवूडमध्ये अधिकृतरित्या कोरोना पॉझिटीव्ह असलेली कनिका कपूर ही पहिलीच सेलिब्रेटी आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी बॉलिवूडमधील सर्वच सेलिब्रेटी घरात राहण्याचा सल्ला देत आहेत एवढंच नाही तर सेलिब्रेटींनीही त्यांची शूटिंग काही दिवसांसाठी थांबवली आहेत. मात्र 10 दिवसांपूर्वी भारतात परतलेल्या कनिकानं क्वारंटाइन केलं नाही तर तिनं एक पार्टी अटेंड केली. काही सूत्राच्या माहितीनुसार कनिका जेव्हा लंडनवरुन परतली त्यावेळी ती तपासणीपासून वाचण्यासाठी एअरपोर्टच्या बाथरुममध्ये लपली होती. जान्हवीनं केलं बहीण खुशीच्या चेहऱ्यावर पेंटिंग, VIDEO पाहिल्यावर पोट धरून हसाल कनिकाच्या या वागण्याबाबत आता लोकांचा राग अनावर झाला आहे. सोशल मीडियावर लोकांच्या आरोग्याशी खेळ केल्याबाबत कनिकाला अटक करण्याची मागणी केली जात आहे. लेखक तुहिन सिन्हा यांनी लिहिलं, मी श्री योगी आदित्यनाथजी यांच्याकडे कनिका कपूर अॅपिडेमिक अॅक्ट 1897 च्या कलम 2 खाली कारवाई करण्यात यावी. जो पर्यंत आपण कठोर कारवाई करणार नाही तोपर्यंत कोरोना व्हायरस विरोधातली ही लढाई आपण जिंकू शकत नाही. असं झाल्यास कनिकाला 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 1000 रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. शिल्पा शेट्टीनं आता केली अभिनेता राजपाल यादवची धुलाई, पाहा VIDEO
कनिकानं तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता तिच्या सोशल मीडिया अकउंटवरुन शेअर केली आहे. कनिकानं लिहिलं, मागच्या 4 दिवसांपासून मला तापाची लक्षण दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट करुन घेतली आणि माझी COVID-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली. मी पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे.
कनिकानं पुढे लिहिलं, मागच्या काही दिवसांपासून मी ज्या ज्या लोकांना भेटले त्या सर्वांची टेस्ट केली जाणार आहे. 10 दिवसापूर्वी मी घरी आले त्यावेळी माझी एअरपोर्टवर सामान्य पद्धतीनं तपासणी करण्यात आली होती. पण मला 4 दिवसांपूर्वीच या व्हायरसची लक्षणं दिसू लागली. सध्या तरी मी सर्वांना एवढंच सांगेन गर्दीत जाणं टाळा, घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. अशी कोणत्याही प्रकारची लक्षण दिसल्यास लगेचच स्वतःची टेस्ट करून घ्या. श्रीदेवींची ‘लेक’ अडकली लग्नाच्या बेडीत, पाहा ग्रँड वेडिंगचे UNSEEN फोटो