मुंबई, 17 ऑक्टोबर : बॉलिवूड स्टार्स आपल्या सिनेमातील भूमिका तर उत्तम साकारतात. पण आपल्या खासगी आयुष्याविषयी उघडपणे बोलणं त्यांच्यासाठी सोपं नसतं. एकीकडे सेलिब्रेटी मीडियाशी अशा गोष्टी शेअर करताना विचार करतात. मात्र दुसरीकडे बॉलिवूडची एक अभिनेत्री बॉलिवूड स्टार्सची खास गुपित आपल्या मुलाखतीमध्ये उलगडताना दिसते. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सिमी ग्रेवाल आहे. या सिमी यांचा 72 वा वाढदिवस. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या करिअरमधील काही खास गोष्टी… सिमी ग्रेवाल अभिनयापेक्षा तिच्या टॉक शोसाठी ओळखली जाते. तिचा टॉक शो Rendezvous with Simi Garewal आजही तेवढाच लोकप्रिय आहे. कारण या शोमध्ये सिमीनं अनेक बॉलिवूड स्टार्सच्या खासगी आयुष्यातील खास गुपित उघड केली आहेत. सिमीच्या शोमध्ये अनेक स्टार्सनी भावनेच्या भरात आपल्या खासगी आयुष्यातील किस्से शेअर केले आहेत. सिमीची खास गोष्ट अशी होती ती कलाकारांच्या भावनिक पैलूंवर खूपच सहजपणे बोलत असे.
Indian Idol च्या ऑडिशनमध्ये स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं KISS केलं आणि…
सिमीनं अनेक बॉलिवूड स्टार्सना त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल असे प्रश्न विचारले आहेत की हे प्रश्न विचारताना मोठ-मोठे पत्रकारही विचार करतात. सिमीसोबतच्या एका मुलाखतीत अभिनेत्री ऐश्वर्या रायनं सुद्धा आपल्या भावना शेअर केल्या होत्या. सिमीनं ऐश्वर्याला, ‘तुला जगातील सर्वात सेक्सी पुरुष कोण वाटतो?’ असा प्रश्न विचारला होता आणि उत्तरादखल ऐश्वर्यानं सलमानचं नाव घेतलं होतं.
KBC ला मिळाला या सीझनचा तिसरा करोडपती, आता जिंकणार का 7 कोटी?
याशिवाय सिमी तिच्या खासगी जीवनाविषयी सुद्धा खूप चर्चेत राहिली होती. सिमीनं रवि मोहनशी लग्न केलं होतं पण काही काळात त्यांच्यात दुरावा आला. सिमीनं घटस्फोट घेतला आणि त्यानंतर आपला एकटेपणा दूर करण्यासाठी काही टीव्ही शो होस्ट केले. तसेच एक वेबसाइटही सुरु केली. काही दिवसांपूर्वी असंही बोललं जात होतं की, सिमीचा हा शो पुन्हा एकदा सुरू होणार असून तिच्या कमबॅक एपिसोडचे पहिले गेस्ट दीपिका-रणवीर असणार आहेत. प्रियांकाच्या सिनेमातील ‘या’ सीनमुळे निकला कोसळलं होतं रडू! ============================================================== VIDEO: अजगराच्या विळख्यातून मजुराच्या सुटकेचा थरार