सिद्धार्थ-कियारा
मुंबई, 8 फेब्रुवारी- बॉलिवूडमधील सर्वात गोड जोडप्यांपैकी एक म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी
च्या जोडीला ओळखलं जातं. गेल्यावर्षीपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अखेर या दोघांनी लग्न करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु होती. या दोघांच्या वेडिंग लूकपासून ते वेडिंग डेस्टिनेशनपर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा सुरु होती. दरम्यान आता या दोघांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचं लग्न म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच होती. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा करत होते. या सेलिब्रेटी कपलने लग्नाची कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नव्हती. मात्र मीडियाच्या माध्यमातून या दोघांच्या लग्नाची चाहूल सर्वांनाच लागलेली होती. आपल्या आवडत्या कलाकारांना पती-पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. (हे वाचा:
Sidharth-Kiara Wedding: कियाराच्या हातातील कलिऱ्यांमध्ये लपलीय खास गोष्ट; पाहून तुम्हीही कराल कौतुक
) काल 7 फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी राजस्थानमधील जैसलमेर येथील आलिशान अशा सूर्यगढ पॅलेसमध्ये सात फेरे घेतले आहेत. यावेळी कियारा-सिद्धार्थचे कुटुंबीय आणि इंडस्ट्रीतील काही जवळचे कलाकार मित्र उपस्थित होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते अखेर रात्री उशिरा या दोघांनी आपले वेडिंग फोटो शेअर करत सर्वांनाच खुश केलं आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहत्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सर्वजण या नवं जोडप्याला शुभेच्छा वर्षाव करत आहेत. समोर आली लग्न पत्रिका- दरम्यान कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नानंतर आता या दोघांची लग्नपत्रिका समोर आली आहे. सिड आणि कियाराची लग्न पत्रिका अतिशय सिम्पल परंतु आकर्षक आहे. ही पत्रिका पांढऱ्या आणि चॉकलेटी रंगात छापण्यात आली आहे. यामध्ये सिद्धार्थ कियाराचं नाव आणि सूर्यगढचा पत्ता देण्यात आला आहे. यावर पान-फुलाची डिझाईन दिसून येत आहे. शिवाय 7 आणि 8 फेब्रुवारीला लग्नाचे कार्यक्रम पार पडणार असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘शेरशाह’ सिनेमाच्या सेटवर भेटले होते. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रचंड पसंत करण्यात आली होती. या सिनेमाच्या सेटवरच सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी सुरुवातीला आपलं नातं लपवून ठेवलं होतं. मात्र नंतर दोघेही एकत्र व्हेकेशनवर जाताना आणि सोबत वेळ घालवताना दिसून येत होते.