JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kiara-Sidharth Wedding: 'मी याच वर्षी लग्न...' कियारा सोबत लग्नाच्या चर्चांवर शेवटी बोललाच सिद्धार्थ मल्होत्रा

Kiara-Sidharth Wedding: 'मी याच वर्षी लग्न...' कियारा सोबत लग्नाच्या चर्चांवर शेवटी बोललाच सिद्धार्थ मल्होत्रा

नुकत्याच एका मुलाखतीत सिद्धार्थने स्वतःच लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

जाहिरात

सिद्धार्थ मल्होत्रा -कियारा अडवाणी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 20 डिसेंबर :**बॉलिवूड मध्ये सध्या एका जोडप्याच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. ते जोडपं म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी. कॉफी विथ करणमध्ये या दोघांनी केलेल्या खुलास्यानंतर आता  या जोडप्याच्या लग्नाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. दोघेही येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या सध्या समोर आल्या होत्या. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाचं ठिकाण आणि पाहुण्यांची यादी देखील समोर आली आहे. दरम्यान, आता नुकत्याच एका मुलाखतीत सिद्धार्थने स्वतःच लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नसला तरी सध्या त्यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या लग्नाच्या बातमीवर मौन तोडलं आहे. ‘मिशन मजनू’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, अभिनेत्यानेही अतिशय मजेशीर उत्तर दिले. हेही वाचा - Mohit Raina: देवों के देव महादेव फेम मोहित रैनाच्या खाजगी आयुष्यात वादळ; वर्षभरातच घेणार घटस्फोट? सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदान्ना अलीकडेच त्यांच्या आगामी ‘मिशन मजनू’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिव्हर एफएमवर दिसले. यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली.  तेथे, रेडिओ जॉकी सुप्रियाने सिद्धार्थला विचारले की, ‘तुझ्याविषयी अशी कोणती अफवा आहे ज्यावर तुला स्पष्टीकरण द्यायचं आहे.’ की  हे ऐकून सिद्धार्थ हसतो आणि मग म्हणतो, “माझ्याविषयी अफवा आहे कि मी याच वर्षी लग्न करणार आहे.” पुढे त्याला ‘म्हणजे तू लग्न करणार नाहीस?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, ‘२०२२ या वर्षात नक्कीच नाही.’’ सिद्धार्थचे हे वक्तव्य ऐकून अभिनेत्री रश्मिका मंदाना जोरजोरात हसायला लागली.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुव्हीज आणि कियारा अडवाणी मुव्हीजचे चाहते संभ्रमात पडले आहेत की अभिनेत्याचे असे उत्तर ऐकून दोघे खरोखरच २०२३ मध्ये लग्न करणार आहेत का. दुसरीकडे, पिंकविलाच्या वृत्तानुसार, सिद्धार्थ आणि कियारा गेल्या काही काळापासून लग्नाचे ठिकाण शोधत आहेत. त्यांनी द ओबेरॉय सुखविलास स्पा अँड रिसॉर्ट्स, चंदीगडशी संपर्क साधला आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच रश्मिका मंदान्नासोबत ‘मिशन मजनू’ या स्पाय-थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर दिशा पटानी आणि राशी खन्नासोबत त्याचा ‘वॉरियर’ देखील आहे. याशिवाय सिद्धार्थकडे रोहित शेट्टीची ‘इंडियन पोलिस फोर्स’ ही वेबसीरिज देखील आहे. कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना, अभिनेत्री ‘सत्यप्रेम’ आणि ‘RC15’ च्या कथेत दिसणार आहे. याशिवाय ती योद्धा या चित्रपटातही दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या