मुंबई, 02 फेब्रुवारी: अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानसोबत (Ibrahim Khan and Palak Tiwari Dating Rumors) दिसली होती. तेव्हापासून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. पलक सोशल मीडियावर (social media) चांगलीच अॅक्टिव्ह आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. पलक लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचंही म्हटलं जातंय. यापूर्वी आलेलं तिचं ‘बिजली’ (Bijlee) गाणं चांगलंच हिट ठरलं होतं. अशातच आता पलक लवकरच वरुण धवनसोबत (Palak Tiwari and Varun Dhawan) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे, अशी माहिती मिळत आहे. याचा एक BTS व्हिडिओदेखील समोर आला असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे वाचा- प्रतीक्षा संपली, ‘Jhund ‘ची डेट रिलीज; Amitabh Bachchan यांनी शेअर केली पोस्ट या BTS व्हिडीओमध्ये पलक तिवारी वरुण धवनसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला गाणं वाजत असून त्यावर वरुण आणि पलक एकमेकांशी स्टेप मॅच करताना दिसत आहेत. त्यामुळे हे दोघं सोबत काम करत आहेत, यावर शिक्कामोर्तब झालंय. या व्हिडीओत पलक तिवारीने लाल रंगाचा शिमरी वन-पीस घातला आहे. यासोबतच तिने केस मोकळे सोडले असून लूकवर सूट होईल, असा मेकअप केलेला दिसत आहे. तर दुसरीकडे वरुण धवन निळ्या रंगाच्या जॅकेटसह काळ्या जीन्समध्ये दिसतोय. दरम्यान, या गाण्याच्या शूटिंगनंतर हे दोघं मुंबईतील एका स्टुडिओबाहेर दिसले होते. यावेळी दोघांनीही एकमेकांसोबत पोज दिल्या. फोटोंमध्ये हे दोघेही छान दिसत आहेत.
पलक तिवारी लवकरच ‘रोझी: द सॅफ्रॉन चॅप्टर’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 14 जानेवारीला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. हा चित्रपट गुरुग्राममधील एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. पलक या चित्रपटात रोझीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘रोझी’ हा एक भयपट असल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुग्राममधील एका बीपीओ कंपनीत काम करणारी रोझी नावाची महिला कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेवर या चित्रपटाचं कथानक आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी पलक हार्डी संधूच्या ‘बिजली’ या गाण्याच्या व्हिडीओमध्ये झळकली होती. त्यानंतर ती रातोरात स्टार झाली. पलक सध्या तिच्या आगामी ‘रोझी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.