मुंबई, 02 जुलै : अभिनेता सुमित राघवन अजूनही वेगळ्याच मूडमध्ये आहे. अक्षरश: त्यानं हे स्वप्नच पाहिलंय जणू. आणि त्यातून बाहेर पडूच नये असं त्याला वाटतंय. हॅम्लेट नाटकाच्या प्रयोगाला चक्क ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू उपस्थित होते. त्यांच्या सोबत दीपा लागूही होत्या. श्रीराम लागूंनी अख्खं नाटक पाहिलं आणि त्यांना ते आवडलंही. त्याबद्दलच सुमित राघवननं लिहिलंय. सुमित लिहितो, ‘कुणकुण होती की ते प्रयोगाला येतील पण जर आले तर ते तीन तास बसू शकतील का, ही देखील हुरहूर होती. पण ते आले,अख्खं नाटक बघितलं आणि हळूहळू उभं राहत त्यांनी आम्हाला स्टॅन्डिंग ओवेशन दिलं. कर्टन कॉलला मी सर्वात शेवटी येतो,त्यांना उभं राहून आमच्यासाठी टाळ्या वाजवताना पाहिलं आणि मला अश्रू अनावर झाले. मी स्टेजवरून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी मला सलाम केला. हेही वाचा राईनपाडा हत्या प्रकरण, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत पाऊस पुन्हा परतणार का? काय म्हणालं हवामान खातं?
‘मी मेकअप काढून त्यांना भेटायला गेलो व्हीआयपी रूममध्ये,त्यांच्या समोर गुढघ्यांवर बसलो,तर ते नुसते मला बघत होते. दीपा ताई म्हणाल्या " अरे ओळखलंस का श्रीराम,हाच तो हॅम्लेट". त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि त्यांनी मला नमस्कार केला ( जो फोटो Rahul Ranade ने काढलाय). ‘मी अजूनही त्या क्षणातून बाहेर पडू शकत नाही,कधीही पडू शकणार नाही. रंगभूमीवरचा खरा नटसम्राट जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हा त्याचं मोल कुठल्याही सन्मानापेक्षा,बक्षिसापेक्षा मोठं आणि खरं असतं. मी खऱ्या अर्थाने भरून पावलो.’