JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Haryana Singer Death: धक्कादायक! रस्त्याकडेला पुरलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह

Haryana Singer Death: धक्कादायक! रस्त्याकडेला पुरलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह

तब्बल दोन आठवड्यांपासून गायब असलेली हरियाणाची गायिका (Haryana Singer) संगीता (Sangeeta) काल मृतावस्थेत आढळून आली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,24 मे-   तब्बल दोन आठवड्यांपासून गायब असलेली हरियाणाची गायिका  (Haryana Singer)  संगीता   (Sangeeta)  काल मृतावस्थेत आढळून आली. त्यामुळे सर्वानांच धक्का बसला आहे. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील एका महामार्गाजवळ तिचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत दिसून आला. ही गायिका दिल्लीत वास्तव्यास होती. संगीताच्या कुटुंबीयांनी तिला 11 मे रोजी शेवटचं पाहिलं होतं. या गायिकेच्या कुटुंबीयांनी 11 मे रोजी तिला शेवटचं पाहिलं असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांनतर तीन दिवसांनी त्यांनी तिच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. संगीताच्या कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा आणि हत्येचा आरोप तिच्यासोबत काम करणाऱ्या दोन तरुणांवर लावला आहे. कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे ही गायिका एका व्हिडीओ सॉंगच्या शूटिंगसाठी रोहित नावाच्या एका तरुणासोबत भिवानी याठिकाणी गेली होती. दरम्यान महम याठिकाणी ती रोहितसोबत एका हॉटेलमध्ये जेवण करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. महम पोलीस एसआय विकास यांनी माहिती देत सांगितलं की, भैनी भैरो गावाच्या एका ओढ्याजवळ आम्हाला काल एक मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह फारच वाईट अवस्थेत आहे. त्याची ओळख पटणंदेखील कठीण झालं होतं. या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी आणि त्या तरुणीची ओळख पटण्यासाठी मृतदेह रोहतकच्या शवगृहात ठेवण्यात आलं होतं. दरम्यान हा मृतदेह हरियाणा गायिका संगीताचा असल्याची ओळख पटविण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या