JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / धक्कादायक!सोनम कपूरच्या घरात चोरी, दागिन्यांसह 1.41 कोटी केले लंपास

धक्कादायक!सोनम कपूरच्या घरात चोरी, दागिन्यांसह 1.41 कोटी केले लंपास

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सोनम कपूरबाबत (Sonam Kapoor) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या (Aanand Ahuja) दिल्ली येथील घरावर चक्क दरोडा पडला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 एप्रिल- बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री सोनम कपूरबाबत   (Sonam Kapoor)  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या  (Aanand Ahuja)   दिल्ली येथील घरावर चक्क दरोडा पडला आहे. इतकंच नव्हे तर चोराने तब्बल 1.41 कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड लंपास केले आहेत. ही माहिती समोर येताच बॉलिवूडसह चाहत्यांनासुद्धा धक्का बसला आहे. एबीपी माझाच्या रिपोर्टनुसार, सोनम कपूरच्या दिल्ली येथील घरात चोरीचा  धक्कादायक प्रकार घडला आहे. या रिपोर्टनुसार, चोरट्याने दागिन्यांसह 1.41 कोटी रुपये लंपास केले आहेत. हा सर्व प्रकार लक्षात येताच सोनमची सासू अर्थातच आनंद अहुजाच्या आईने दिल्ली येथील तुघलक रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनतर पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेत शोधाशोध सुरु केली आहे. ही घटना अत्यंत हायप्रोफाईल असल्याने दिल्ली पोलिसांनी अनेक पथके तयार केल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. सोनम कपूरचं दिल्ली येथील घरसुद्धा फारच आलिशान आहे. या घरात 9 केअर टेकर आणि तब्बल 25 नोकर असतात. त्यासोबतच ड्रॉयव्हर, माळी आणि इतर कामांसाठी नेमण्यात आलेले कर्मचारीदेखील असतात. मात्र अद्याप चोराचा सुगावा लागलेला नाहीय. दिल्ली पोलीस या सर्वांची कसून चौकशी करत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ‘‘सोनम कपूर सासू सरला अहुजा यांनी म्हटलं आहे, ‘त्यांच्या घरात त्यांनी कपाटात हे सर्व दागिने आणि रक्कम ठेवली होती. तब्बल दोन वर्षांपूर्वी सर्व दागिने तपासून ठेऊन देण्यात आले होते. मात्र काल पहिले असता, हा सर्व माल गायब होता’. त्यांनतर त्यांनी तडकाफडकी पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या