JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : शिल्पा शेट्टीलाही मोह आवरला नाही, 'बहरला हा मधुमास' वर केला अप्रतिम डान्स

VIDEO : शिल्पा शेट्टीलाही मोह आवरला नाही, 'बहरला हा मधुमास' वर केला अप्रतिम डान्स

शिल्पा देखील ‘बहरला हा मधुमास नवा’ या मराठी गाण्यावर थिरकरी आहे. तिचा ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जाहिरात

शिल्पा शेट्टीलाही मोह आवरला नाही

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मे- सध्या सगळीकडं महाराष्ट्र शाहीर या सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमातील ‘बहरला हा मधुमास नवा’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स करत आहेत. आता या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री हिला देखील रिल्स करायचा मोह आवरला नाही,. शिल्पा देखील  ‘बहरला हा मधुमास नवा’ या मराठी गाण्यावर थिरकरी आहे. तिचा ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर ठेका धरत शिल्पानं शेअर केलेल्या व्हिडिओवर सध्या नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. शिल्पाचं हे मराठी प्रेम सगळ्यांनाच आवडलं आहे. शिल्पा सारख्या अभिनेत्रीनं माझ्या सिनेमातील गाण्यावर ताल धरणं हा खरंतर पदार्पणातच मला मिळालेला मोठा सम्मान आहे अशी कमेंट ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाची अभिनेत्री सना शिंदे हिनं दिली आहे. वाचा- ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; दमदार VFX सह चित्रपटात करण्यात आलेत हे बदल यावेळी शिल्पाने येल्लो ऑकर रंगाचा कुर्ता आणि प्लाझो परिधान केलं आहे. ज्यात शिल्पाचं सौंदर्य खुलून आलंय. तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. यापूर्वीही अनेक सेलेब्स या गाण्यावर थिरकले आहेत. परदेशात देखील या गाण्याची क्रेझ पाहायला मिळाली होती.

संबंधित बातम्या

अनेक बॉलिवूड कलाकार सध्या मराठीकडं वळताना दिसतात. अनेक जणांनी तर मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. एकूणचं काही आता बॉलिवूडकरांना देखील मराठी सिनेमाची भूरळ पडली आहे. सलमान खान असेल किंवा आणि कोणता मोठा स्टार मराठी सिनेमात नेहमीच काम करण्याशीट उत्सुकता दाखवताना दिसतात. या मराठी प्रेमापोठी सलमान खाननं रितेश देशमुखच्या वेड सिनेमात एक गाणं केलं.

किली पॉल बहिणीसोबत थिरकला होता ‘बहरला हा मधुमास नवा’ गाण्यावर काही दिवसापूर्वी टांझानियाच्या किली पॉलच्या रील्सला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरचे रील्स किली पॉल सोशल मीडियावर शेअर करत असतात. किली आणि त्याची बहीण नीमा पॉल यांनी देखील ‘बहरला हा मधुमास नवा’ या मराठी गाण्यावर थिरकले होते. त्यांचा ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. किली आणि नीमा यांनी ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, ‘या गाण्यावर डान्स केला, खूप एन्जोय केलं.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या