मुंबई, 25 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कोरोना व्हायरसमुळे घरीच आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती सतत चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. याशिवाय ती टिक टॉकवरही खूप सक्रिय असलेली दिसून येते. दर दिवशी तिचा कोणता ना कोणता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. टिक टॉक व्हिडीओमध्ये ती आपल्या अभिनयातून सर्वांची मन जिंकत तर आहेच पण या सोबतच ती लवकरच बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे. दरम्यान एका मुलाखतीत शिल्पानं स्वतःच्या बहिणीबाबतच धक्कादायक खुलासा केला आहे. शिल्पा शेट्टी निकम्मा या सिनेमातून लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. त्यानिमित्तानं काही दिवसांपूर्वीच तिनं पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत बहीण शमिता शेट्टीबाबत धक्कादायक खुलासा केला. शमितामुळे मला नेहमीच असुरक्षित वाटत असे असं या मुलाखतीत शिल्पानं सांगितलं. शिल्पा म्हणाली, माझ्या बाबांनी मला सांगितलं शमिताच्या जन्माच्या एका वर्षातच मला तिच्या आणि माझ्या स्किन कलरमधला फरक समजू लागला होता. ती गोरी आहे या भावनेनं मला नेहमीच असुरक्षित वाटत असे. मी माझ्या आई-बाबांना नेहमी विचारायचे की तुम्ही तिला गोरी आणि मला काळी का बनवलं. या गोष्टीमुळे नाराज होऊन मी अनेकदा ती झोपल्यावर तिची वेणी कापून टाकत असे आणि त्यानंतर ती खूप रडत असे. होम क्वारंटाईनमध्ये मैत्रिणींसोबत झोपा काढतेय मलायका, Photoवर अर्जुनची खास कमेंट
शिल्पा पुढे म्हणाली, मी शमिताच्या आधी ऑडिशन दिल्या होत्या पण त्यावेळी मला नेहमीच भीती वाटत असे. मला नेहमी वाटत असे की माझी बहीण माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसते. ती एक चांगली अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतच ती एक चांगली डान्सर सुद्धा आहे. त्यामुळे माझ्या मनात नेहमीच ही भीती असे की शमिताच्या डेब्यूनंतर मला या इंडस्ट्रीमध्ये कोणीच काम देणार नाही. उर्वशी रौतेलानं शेअर केला HOT VIDEO, सोशल मीडियावर बिकिनी लुकची चर्चा बहीण शमितासोबतच्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना शिल्पा म्हणाली, ‘आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही खूप भांडायचो. एकदा तर मी शमिताला आई-बाबांच्या कपाटात बंद करून ठेवलं होतं. जेव्हा ती बाहेर निघाली त्यावेळी ती चंडालिना माता झाली होती. आमच्या दोघांमध्ये प्रचंड भांडणं होत असत. एकदा मी तिच्यावर सनमाइकाचा एक तुकडा फेकून मारला होता. ज्याचा व्रण तिच्या चेहऱ्यावर अद्याप आहे.’
शिल्पा शेट्टीनं बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं. त्या मानानं शमिताला मात्र बॉलिवूडमध्ये स्वतःची खास जागा बनवता आली नाही. त्यामुळे मागच्या बऱ्याच वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. शिल्पा काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आणि झाली असून तिनं मुलीचं नाव समिशा ठेवलं आहे. होम क्वारंटाईनमध्ये टायगर नाही तर या खास व्यक्तीला वेळ देतेय दिशा पाटनी!