JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शिल्पा शेट्टीनं आता केली अभिनेता राजपाल यादवची धुलाई, पाहा VIDEO

शिल्पा शेट्टीनं आता केली अभिनेता राजपाल यादवची धुलाई, पाहा VIDEO

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात शिल्पा राजपाल यादवला मारताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागच्या काही दिवसापासून एका व्हायरल व्हिडीओमुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा नवऱ्याच्या कानाखाली मारतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण आता तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिच्यासोबत अभिनेता रामपाल यादव सुद्धा आहे आणि शिल्पा त्याची जोरदार धुलाई करताना दिसत आहे. याला कारण आहे रामपालनं शिल्पाला विचारलेला प्रश्न. शिल्पा शेट्टी लवकर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. रोमँटिक कॉमेडी सिनेमा ‘निकम्मा’मधून शिल्पा बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे आणि या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता अभिमन्यू दसानी आणि शर्ली सेठिया सुद्धा दिसणार आहेत. मात्र याशिवाय शिल्पा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती नेहमीच पतीराज कुंद्रासोबत टीक टॉक व्हिडीओ शेअर करत असते. पण आता तिनं राजपाल यादवसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती राजपालला मारताना दिसत आहे. Coronavirus वर कार्तिकचा Breathless डायलॉग, 2 मिनिटं 24 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल

शिल्पानं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी लिंबूचं चाटण करताना दिसत आहे. तिच्यामागे राजपाल यादव त्याच्या मित्रासोबत उभा असतो. शिल्पाला असं करताना पाहून राजपाल म्हणतो, सून जर लिंबू चाटत असेल तर हे गरजेच नाही की ती तुम्हाला गुड न्यूज देणार आहे. काळ बदलला आहे. असंही असू शकतं की ती रात्रीची दारूची नशा उतरवत असेल. Coronavirus चा धोका असूनही राधिका पोहोचली लंडनला, शेअर केला एअरपोर्टवरील अनुभव

जाहिरात

राजपालचं हे बोलणं ऐकताच शिल्पा त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावू लागते. शिल्पा आणि राजपाल यांचा हा कॉमेडी व्हिडीओ खूप व्हायरल होत असून हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. शिल्पाप्रमाणे राजपाल यादव सुद्धा टिक-टॉकवर खूप सक्रिय आहे. शिल्पाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ‘निकम्मा’नंतर ती ‘हंगामा 2’मध्ये सुद्धा दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत मिनाज जाफरी सुद्धा दिसणार आहे. Coronavirus मुळे 68 वर्षांपूर्वीचं प्रेमगीत झालं व्हायरल, VIDEO पाहिलात का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या