JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Shehnaaz Gill च्या नावासमोर या चिमुकल्याने लिहिलं Shukla; चाहते झाले भावुक, पाहा VIDEO

Shehnaaz Gill च्या नावासमोर या चिमुकल्याने लिहिलं Shukla; चाहते झाले भावुक, पाहा VIDEO

शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाची लव्हस्टोरी कोणापासूनचं लपून राहिली नाही. बिग बॉसच्या घरापासून या दोघांनी एकमेकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5ऑक्टोबर- बिग बॉस (Bigg Boss) फेम शेहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि सिद्धार्थ शुक्लाची (Sidharth Shukla) जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती. सतत सोशल मीडियावर या दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा होता असे. इतकंच नव्हे तर चाहत्यांना या दोघांनी लवकरचं लग्न करावं अशी इच्छा होती. दरम्यान सोशल मीडियावर दोघेही लवकरच दोघेही लग्न करणार असल्याचं आणि त्यासाठी प्लॅनिंग सुरु केल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. शेहनाजलाही यातून सावरणं कठीण झालं आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये एका चिमुकल्याने शेहनाजच्या नावासमोर शुक्ला लावत सर्वांनाच भावुक केलं आहे.

संबंधित बातम्या

शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाची लव्हस्टोरी कोणापासूनचं लपून राहिली नाही. बिग बॉसच्या घरापासून या दोघांनी एकमेकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. बिग बॉसनंतरही हे दोघे नेहमीच सोबत असत. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला होता. मात्र नशिबाने काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. सिद्धार्थच्या जाण्याने शेहनाजला फार मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीला सावरणं फारच कठीण जात आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलने जसं जगाशी नातचं तोडलं आहे. ती अजूनही बाहेर पडलेली नाहीय. किंवा अजूनही तिने सोशल मीडियावर पुनरागमन केलेलं नाहीय. दरम्यान सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि शेहनाजचे चाहते त्यांचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. **(हे वाचा:** Shehnaz Gill या दिवशी शूटिंगवर परतणार; जाणून घ्या डिटेल्स ) नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शेहनाज एका लहान मुलासोबत दिसून येत आहे.अभिनेत्री या मुलासोबत ‘गेस द कॅरेक्टर’ हा गेम खेळत आहे. यावेळी हा लहान मुलगा त्याला विचारलेल्या प्रश्नांची अत्यन्त अचूक उत्तरे देत असतो. दरम्यान शेहनाज त्याला आपलं योग्य नाव विचारते यावर त्या ऍपमध्ये शेहनाजचं योग्य नाव ‘शेहनाज गिल शुक्ला’ असं येत. हे पाहून अभिनेत्री स्वतः चकित होते. आणि नंतर मोठमोठ्याने हसू लागते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. (**हे वाचा:** ‘…. तर नस कापून घेईन’ अभिनेता Kartik Aaryan ला चाहतीने दिली धमकी! ) हा व्हिडीओ शेहनाज गिलच्या ‘होंसला रख’ या चित्रटाच्या सेटवरील आहे. आणि हा चिमुकला या चित्रपटातील बालकलाकार शिंदा ग्रेवाल आहे. यावेळी व्हिडीओमध्ये शेहनाज आणि शिंदासोबत इतर कलाकारही कॉफी पित बसल्याचं दिसून येत आहेत. हा व्हिडीओ स्वतः शिंदा ग्रेवालने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या