JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लेक सुहाना खानला साडीत पाहून आई गौरीलाही भावना झाल्या अनावर, PHOTO पोस्ट करत म्हणाली..

लेक सुहाना खानला साडीत पाहून आई गौरीलाही भावना झाल्या अनावर, PHOTO पोस्ट करत म्हणाली..

सुहाना खानने मनीष मल्होत्राच्या साडी कलेक्शनसाठी मॉडेलिंग केल्याचे समोर आले आहे. सुहानाचे हे फोटो पाहून आई गौरी खानलाही भावना अनावर झाल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी- बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Bollywood Superstar Sharukh Khan) आणि प्रसिद्ध इंटिरिअर डेकोरेटर गौरी खान (Gauri Khan) यांची लाडकी मुलगी सुहाना खान (Suhana) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात, सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा हे दिग्दर्शक झोया अख्तरबरोबर एका डान्स क्लासमध्ये प्रशिक्षण घेताना दिसले होते. तर नुकतंच सुहानाने मनीष मल्होत्राच्या साडी कलेक्शनसाठी मॉडेलिंग केल्याचे समोर आले आहे. सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मनीष मल्होत्राने ‘क्लासिक व्हाइट चिकनकारी’ अशी कॅप्शन देत आपल्या इन्स्टाग्रामवर सुहानाचे फोटो शेअर केले आहेत. हिरव्यागार पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाची चिकनकारी साडी नेसलेल्या सुहानाचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो अत्यंत आकर्षक दिसत आहेत. साडीमधील तिचा लुक पाहून चाहते मात्र तिच्यावर फिदा झाले आहेत. यावरून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करताचा लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास यशस्वी होईल असचं दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्य़ा काळात ती बॉलिवूड अभिनेत्रींना तगडी टक्कर देताना दिसेल यात काहीच शंका नाही. वाचा- राखी सावंत झाली युगांडाची राजकन्या अन् खरेदी केलं हेलिकॉप्टर, कसं ते पाहा.. सुहानाची आई गौरी खान हिने देखील (Gauri khan) या शुटमधील एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे. आपल्या लेकिरया फोटो शेअर करत तिनं कोणतीही कॅप्शन न लिहता, फक्त एक हार्टची इमोजी टाकली आहे. हा फोटोच सगळं काही सांगून जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुहाना खान आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी तयारी करत असल्याचं दिसत आहे. आर्चीज कॉमिकवरील (Archies Comic) हिंदी चित्रपटात अँड्र्यूज, वेरोनिका लॉज आणि बेट्टी कूपर यांच्या भूमिकांसाठी सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर या तिघांची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याबबात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.या महिन्याच्या सुरुवातीलादेखील सुहाना खानने लाल साडीतील आपले काही फोटो-परफेक्ट शॉट्स शेअर केले होते. ती साडीही मनीष मल्होत्रानेच डिझाइन केली होती. त्यानंतर तिचे हे पांढऱ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वडील सुपरस्टार शाहरुख खान यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळालेल्या सुहानाने इंग्लंडच्या आर्डिंगली कॉलेजमध्ये तसंच न्यूयॉर्क विद्यापीठातही चित्रपट विषयाचं शिक्षण घेतलं आहे. तिने काही थिएटर शोदेखील केले आहेत. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या थिओडोर गिमेनो दिग्दर्शित ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या शॉर्ट फिल्ममध्ये तिनं काम केलं आहे. याचद्वारे खऱ्या अर्थाने सुहानाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता बॉलिवूडमधील तिच्या पदार्पणाची प्रतीक्षा असून, लवकरच चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार असं दिसत आहे. सुहानाने यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या