मुंबई, 24 फेब्रुवारी: रिअॅलिटी टीव्ही शो शार्क टँक इंडियाचा (Shark Tank India) पहिला सीझन संपला आहे. जेव्हापासून हा शो सुरू झाला तेव्हापासून या शोमधील जजेस चर्चेत आहेत. या शोमुळे अनेक तरुणांच्या कल्पनांना शार्क्स (Sharks) अर्थात शोच्या जजेसडून (Show Judges) फंड मिळाला आहे. शोच्या जजेसनी अनेक तरुणांच्या स्टार्टअप्समध्ये मुक्तपणे पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार (Investors) म्हणून ते सध्या नवीन पिढीच्या हृदयावर राज्य करत आहेत. या शोमधील सर्व जजेसपैकी बिझनेसमन आणि भारतपेचे को-फाउंडर अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) सर्वाधिक चर्चेत आहेत. अश्नीर आपल्या रोखठोक आणि अत्यंत निगेटिव्ह कमेंटसाठी प्रसिद्ध झाले आहेत. अश्नीर नेटीझन्सच्या मीम्स आणि ट्रोलला बळी पडले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अश्नीर ग्रोव्हर यांनी ट्रोलर्सचा कसा सामना केला हे उघड केलं आहे. कॉमेडियन रोहन जोशी (Rohan Joshi) आणि साहिल शाह (Sahil Shah) यांच्याशी झालेल्या संभाषणात अश्नीरनं सांगितलं की, त्यांच्याबदद्दल सोशल मीडियावर लोक खूप वाईट बोलतात. मध्यरात्री उठून ते सोशल मीडियावरील लोकांच्या वाईट कमेंट्स (Comments) डिलीट करतात. अश्नीर म्हणाले की, मला खूप शिवीगाळ होते. मी रात्री तीन वाजता उठून घाणेरड्या कमेंट्स डिलीट करतो. मी काही लोकांना ब्लॉकही केलं आहे. फक्त ब्लॉकच नाही तर भविष्यात त्या नंबरवरून कोणतंही अकाउंट ओपन झाल्यास ते नंबर माझ्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवरून ब्लॉकच राहतील, याची मी काळजी घेतली आहे. हे वाचा- लॉकडाउनमधील बिझनेस आयडियाला ‘शार्क टँक इंडिया’मधून मिळाली लाखोंची गुंतवणूक या संभाषणादरम्यान अश्नीर पुढे म्हणाले की, लोक माझ्याकडे सेल्फी घेण्यासाठी येतात. परिणामी मला कधीकधी दोन वेगवेगळ्या कॅमेऱ्यांकडे बघून बळजबरी हसावं लागतं. सेल्फी घ्यायचा असेल तर एखाद्या सुंदर अभिनेत्रीसोबत सेल्फी घ्यावा. लोक माझ्याकडे का येतात हे मला समजत नाही. भारतपेसारख्या डिजिटल ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्मचा को-फाउंडर असलेल्या अश्नीर ग्रोव्हर यांना सध्या देशातील एक प्रमुख बिझनेसमनपैकी एक मानलं जातं. आपल्या लक्झुरियस लाईफस्टाईल आणि लक्झरी कार कलेक्शनसाठी (Car Collection) ते प्रसिद्ध आहेत. शोमधील स्पष्टवक्तेपणाबद्दल काहींनी त्यांचं कौतुकही केलं तर काहींनी टीकाही केली. एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की अश्नीर शार्क टँक इंडियाच्या प्रत्येक एपिसोडसाठी 10 लाख रुपये मानधन घेत होते. हे वाचा- ‘आता मालिकेचाच कडेलोट करा!’, सुख म्हणजे .. मधील ट्विस्टवर चाहते वैतागले सध्या अश्नीर ग्रोव्हर आपल्या पत्नीमुळे अडचणीत सापडले आहेत. अश्नीरची पत्नी माधुरी जैनला कंपनीतील फंडामध्ये घोटाळा केल्याच्या आरोपावरून कंपनीतून काढून टाकण्यात आलं आहे.