मुंबई, 24 मार्च- अभिनेत्री शनाया कपूरने (Shanaya Kapoor) अजून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नाही. लवकरच ती शशांक खेतानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचं म्हटलं जातंय. परंतु त्यापूर्वीच गेल्या काही दिवसांपासून स्टारकिड शनाया कपूरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे शनायाचे फोटो. शनाया दुबईमध्ये व्हेकेशनसाठी (Dubai Vacation) गेली होती तिथले फोटो ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत होती. तिच्या व्हेकेशनचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये शनायाने ब्लू बिकीनी घातली आहे. या फोटोंमध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे. तिच्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. अशातच शनाया पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली असून, त्याच कारण अगदी खास आहे. तिनं तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या आधीच नवीन लक्झरी कार विकत घेतली आहे. तिने स्वत:साठी एक नवीन ऑडी Q7 कार खरेदी केली आहे. नवीन आलिशान कारसह शनायाचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत. ऑडी मुंबई वेस्टने (Audi Mumbai West) त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शनाया आणि तिच्या आई-वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये शनाया तिच्या लक्झरी ऑडी Q7 कारसोबत पोज देताना दिसत आहे. तिच्या कारची किंमत 80 लाख रुपये आहे. नवीन कार खरेदी केल्यानं शनाया कपूर खूप आनंदी आणि खूप उत्साही आहे, हे या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर दिसणार्या हास्यावरूनच लक्षात येतं. शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही बॉलिवूड (Bollywood) अभिनेता संजय कपूर (Actor Sanjay Kapoor) आणि माहीप कपूर यांची मुलगी आहे. शनाया कपूर लवकरच बेधडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शशांक खेतान या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. तर, करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटातून शनायासोबत लक्ष्य आणि गुरफतेह सिंग पिरजादाही डेब्यू करत आहेत. करण जोहर हा बॉलिवूडमधील स्टार किड्सना इंडस्ट्रीत लाँच करण्यासाठी ओळखला जातो. गेल्यावर्षी त्याने आपण शनाया कपूरला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची घोषणा केली होती.
शनायाच्या लाँचिंगची घोषणा करणने करण्यापूर्वी तिचं इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट होतं. मात्र, त्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली असून, तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. तिचे इन्स्टाग्रामवर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.