JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sana Saeed : शाहरुखच्या ऑनस्क्रीन लेकीचा साखरपुडा, गुडघ्यावर बसून हटके अंदाजात केलं प्रपोज

Sana Saeed : शाहरुखच्या ऑनस्क्रीन लेकीचा साखरपुडा, गुडघ्यावर बसून हटके अंदाजात केलं प्रपोज

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील छोटी अंजली आठवतेय का?. जिनं शाहरुख खानच्या लेकीची भूमिका साकारली होती. ती अंजली म्हणजेच सना सईद.

जाहिरात

सना सईद

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जानेवारी : ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील छोटी अंजली आठवतेय का?. जिनं शाहरुख खानच्या लेकीची भूमिका साकारली होती. ती अंजली म्हणजेच सना सईद. शाहरुख खान ची ऑनस्क्रीन मुलगी म्हणून तिची एक वेगळी ओळख बनली आहे. अभिनेत्री सना सईदने नवीन वर्षी एक गुडन्यूज शेअर केली आहे. सना सईदचा नुकताच साखरपुडा झाला असून तिनं सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सना सईदने बॉयफ्रेंड साबा वॅगनरसोबत साखरपुडा केला आहे. सबा वॅगनरने तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केले आणि नंतर अंगठी घातली. सना सईद आणि साबा वॅगनर यांनी इंस्टाग्रामवर या गोड क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत सना सईदने अंगठी, हृदय आणि प्रेमाचा एक इमोजी दिला आहे. सना सईदच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

संबंधित बातम्या

अखेर अंजलीला तिचा राहुल सापडल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. सनाच्या या गुडन्यूजने तिचे चाहतेही खूप आनंदी झाले आहेत. त्याचबरोबर सेलेब्स देखील सना सईदचे अभिनंदन करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्मे सना सईद काळ्या गाऊनमध्ये तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतेय.

दरम्यान, साबा वॅगनर हा लॉस एंजेलिस येथे राहणारा हॉलिवूड साउंड डिझायनर आहे. दोघेही एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत. सना सईदने ‘कुछ कुछ होता है’ नंतर ‘बादल’ आणि ‘हर दिल जो प्यार करेगा’ सारख्या चित्रपटात काम केले. नंतर तिने ‘लो हो गई पूजा इस घर की’ आणि ‘बाबुल का आंगन छोटे ना’ सारख्या टीव्ही शोमध्येही काम केले. तिने ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिए 7’ आणि ‘खतरों के खिलाडी 7’ सारखे रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या