JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / #BoycottPathan ट्रेंड होत असताना Shahrukh Khan अन् गौरी खानचा 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभाग; फोटो VIRAL

#BoycottPathan ट्रेंड होत असताना Shahrukh Khan अन् गौरी खानचा 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभाग; फोटो VIRAL

एकीकडे अक्षय आमिर यांच्या सिनेमाला बॉयकॉट करत असताना शाहरुख संदर्भात दोन हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. एकीकडे चाहते त्याला सपोर्ट करत आहेत तर दुसरीकडे त्याच्यावर टीका होत आहे.

जाहिरात

Shahrukh Khan supporting Har Ghar Tiranga campaign

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 14 ऑगस्ट: शाहरुख खान येत्या काळात पठाण सिनेमातून पुन्हा एकदा दमदार पदार्पण करायला सज्ज होत आहे. पण सध्याचा ट्रेंड बघता त्याच्या येऊ घातलेल्या सिनेमाला आधीच बॉयकॉट करावं अशी मागणी ट्विटरवर केली जात आहे. पण शाहरुख मात्र सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला आवाहन केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होत शाहरुखने सुद्धा घर तिरंगा फडकवल्याचं दिसून आलं आहे. त्याची पत्नी (gauri khan and shahrukh khan joined har ghar tiranga campaign) गौरी खानने खास तिरंग्यासह फोटो शेअर करत ‘स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ अशी कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा करत देशभरात सगळीकडे ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. केंद्रसरकाराच्या या मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्टदरम्यान सर्व भारतीयांनी आपल्या घराबाहेर देशाचा तिरंगा फकडकवून मोहिमेत सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शाहरुख सपत्नीक या मोहिमेत सहभागी झाल्याचं दिसून आलं आहे. एका व्हिडिओमध्ये शाहरुखचा मुलगा अब्राहम आणि आर्यन भारताचा तिरंगा आपल्या घराच्या बाहेर म्हणजे मन्नत बाहेर फडकवताना दिसत आहेत तर शाहरुख त्यांना मदत करताना दिसत आहे. यावर सध्या संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहे.

एकीकडे शाहरुख खानबद्दल चाहत्यांमध्ये असलेलं मत, त्याचं नुकतंच एका फॅनशी झालेलं भांडण आहे अनेक कारणांनी त्याच्या सिनेमावर बहिष्कार टाकावा अशी मागणी समोर येत आहे. तर शाहरुखचे फॅन्स यावर प्रतिउत्तर देताना दिसत आहेत. आता याउलट #Pathaanfirstdayfirstshow नावाने एक हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. हे ही वाचा- लाल सिंग चढ्ढाचं कौतुक करणं Hrithik Roshan ला भोवलं; ट्विटरवर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ होतोय ट्रेंड यामध्ये चाहत्यांनी शाहरुखच्या सिनेमाला सपोर्ट केला असून त्याचा सिनेमा नक्कीच हिट होईल अशी आशा व्यक्त केली आहे. शाहरुखने आज घराबाहेर येऊन चाहत्यांना दर्शन दिल्याचं सुद्धा समोर आलं आहे.

सध्या शाहरुख वर्क फ्रंटवर पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. एकीकडे रॉकेटरी, ब्रह्मास्त्र सिनेमात त्याचा कॅमिओ दिसून आला आहे तर दुसरीकडे पठाण आणि जवान असे सिनेमे त्याच्या झोळीत आहेत. येतं वर्ष हे एसआरके साठी महत्त्वाचं आणि ब्लॉकबस्टर असणार असं म्हणायला हरकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या