शाहरुख खान
मुंबई, 17 फेब्रुवारी- शाहरुख खान ने तब्बल चार वर्षांनंतर ‘पठाण’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं आहे. मात्र या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने त्याने आपण आजही बॉलिवूडचा बादशाह असल्याचं सिद्ध केलं आहे. शाहरुखच्या या चित्रपटाने जगभरात 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. आज शाहरुख एका चित्रपटासाठी किंवा एका जाहिरातीसाठी कोट्यावधींच्या घरात मानधन घेतो. परंतु किंग खानचं पहिलं मानधन तुम्हाला माहितेय का? अभिनेत्याला मिळालेलं पहिलं मानधन पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आपल्या जबरदस्त कमाईसह या चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ‘झिरो’ चित्रपटानंतर शाहरुख खानची कारकीर्द संपुष्ठात येणार अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र चार वर्षांच्या विश्रांतीनंतर शाहरुखने धमाका केला आहे. या चित्रपटासह अभिनेत्याने आजही आपणच किंग ऑफ बॉलिवूड असल्याचं दाखवून दिलं आहे. (हे वाचा: Swara Bhasker-Fahad Ahmad:स्वरा भास्करने लग्नात नेसलेली साडी आणि दागिने आहेत खूपच स्पेशल; ट्विट करत सांगितली खासियत ) या चित्रपटानंतर शाहरुख खान प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्याच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत अनेक चर्चा होत आहेत. दरम्यान शाहरुख खानने या चित्रपटासाठी 100 कोटी घेतल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अभिनेत्याने अधिकृतपणे यावर कोणतंही भाष्य केलेलं नाहीय. अशातच आता शाहरुख खानच्या पहिल्या मानधनाबाबत माहिती समोर आली आहे. आज अब्जाधीश असलेला शाहरुख एकेकाळी इतक्या कमी पैशांसाठी काम करत होता हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. शाहरुख खानची पहिली कमाई- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आज आलिशान आयुष्य जगत आहे. त्याच्या मुला- मुलीचे कपडेसुद्धा इतके महाग असतात की, विश्वास बसणं कठीण होत. भारतासह दुबईसारख्या लग्जरी देशांमध्येसुद्धा शाहरुख खानची प्रॉपर्टी आहे. आज ऐश्वर्यात लोळणारा अभिनेता एकेकाळी सिनेमागृहांमध्ये तिकीट विक्रीच काम करत होता. या कामातून त्याला पहिल्यांदा50 रुपयाचं मानधन मिळालं होतं.मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज अभिनेत्याजवळ जवळपास 51000 कोटींची संपत्ती आहे.
शाहरुख खान आगामी काळात ‘जवान’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्याची नयनतारा या साऊथ सुंदरीसोबत केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.