JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शाहरुख खानने गौरीशी लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म, असं जिंकले गौरीच्या आई-वडिलांचे मन

शाहरुख खानने गौरीशी लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म, असं जिंकले गौरीच्या आई-वडिलांचे मन

शाहरुख गौरीच्या प्रेमात पडला होता. आधी त्यानं गौरीचं मन जिंकण्यासाठी धडपड केली आणि मग आई-वडिलांची समजूत काढण्यासाठी शाहरूखला संघर्ष करावा लागला.

जाहिरात

शाहरुखने गौरीशी लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 एप्रिल- दिल्लीतून आलेला एक मुलगा मुंबईत आला आणि बॉलिवूडचा बादशाहा बनला. आज शाहरूख बॉलिवूडवर राज्य करतो. शाहरूखनं घेतलेल्या कष्टाचं आज चीज झालं आहे आणि तो सुपरस्टार झाला आहे. शाहरूखचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असा आहे. आजही बॉलिवूडमध्ये येणारा प्रत्येक नवोदित कलाकार कॅमेऱ्यासमोर अभिनय करतात, तेव्हा ते शाहरुख खानसारखे बनण्याचे स्वप्न पाहतात. शाहरुख खानने त्याच्या आयुष्यात जेवढी मेहनत घेतली तितकच त्याला यश मिळालं आहे. शाहरुखखानने 1991 मध्ये गौरीसोबत लग्न केले आहे. प्रत्येक प्रेम कथांप्रमाणे शाहरुख आणि गौरीच्या प्रेम कथेतही काही चढ-उतार होते. या दोघांच्या प्रेमालाही अनेक अडचणी आल्या. परंतु, आजपर्यंत दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. ते दोघे आज आदर्श जीवन जगत आहेत.शाहरुख खानची ऑनस्क्रीन लव्हस्टोरी आजही लोकांना आवडते. पण शाहरुखचं रिअल लाईफ देखील प्रेमानी भरलेली आहे. शाहरुख गौरीच्या प्रेमात पडला होता. आधी त्यानं गौरीचं मन जिंकण्यासाठी धडपड केली आणि मग आई-वडिलांची समजूत काढण्यासाठी शाहरूखला संघर्ष करावा लागला. वाचा- रणबीर-रणवीरसारखा दिसणाऱ्या ‘या’ मुलाचं संजय लीला भन्साळींसोबत आहे खास कनेक्शन शाहरुख खानचं लग्न झालं तेव्हा तो फक्त 26 वर्षांचा होता आणि गौरी 21 वर्षांची होती. शाहरुख खानने गौरीच्या आई-वडिलांकडे हिंदू बनून तिच्याशी लग्न करण्याची परवानगी मागितली होती. शाहरुख खानने गौरीच्या आई-वडिलांना आपले नाव अभिनव असल्याचे सांगितले होते. 2008 मध्ये शाहरुख खानने अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या ‘फर्स्ट लेडी’ या शोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘आम्ही खूप लहान होतो. गौरीसाठी हा एक कठीण निर्णय होता, ती अशा मुलाच्या प्रेमात पडली होती, जो दुसऱ्या धर्माचा होता. शिवाय तो चित्रपटात काम करणार होता. शाहरुख खान आणि गौरीची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. लग्नासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करत शाहरुख खानने गौरी खानसोबत लग्न केले. 90 च्या दशकातही दुसऱ्या धर्मात लग्न करणे ही मोठी गोष्ट होती. जेव्हा शाहरुख खान जेव्हा गौरीच्या घरी तिला लग्नासाठी मागणी घालायला गेला तेव्हा त्याने आपलं नाव बदलून अभिनव ठेवलं.

गौरी खाननं याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं की, अभिनव नावाने आम्ही शाहरुख खानची आई-वडिलांशी ओळख करून देण्याचा निर्णय घेतला. शाहरुख खान आणि गौरी ने 1991 मध्ये लग्न केले आहे. शाहरुख आणि गौरी यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे अनेक प्रसंगातून समोर आले आहे. या जोडीला तीन मुलं आहेत. लग्नाच्या 6 वर्षांनंतर 1997 मध्ये शाहरुख खानला आर्यन खान नावाचा पहिला मुलगा झाला. त्यानंतर 2000 मध्ये सुहाना खानचा जन्म झाला. 2013 मध्ये शाहरुख खानचा दुसरा मुलगा अबराम खानचा जन्म झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या