shahid kapoor and mira kapoor
मुंबई, 29 ऑगस्ट : बॉलिवूडमधील प्रचंड ग्लॅमरस आणि प्रसिद्ध नवरा बायकोच्या यादीत शाहिद कपूर आणि मीरा रजपूत हे नाव अग्रस्थानी घेतलं जातं. शाहिद कपूरची बायको मीरा रजपूतचं चित्रपटसृष्टीशी काहीही नातं नाहीये. पण ती कुठल्याही अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. मीराही आता सेलिब्रिटी आहे. मीराही या कलाजगामध्ये स्थिरावली आहे. शाहिदसोबत एखाद्या ठिकाणी जाणं असो किंवा मग मुलाखती देणं असो मीरा हे सगळं उत्तम सांभाळते. शाहिद आणि मिरची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. ह्या दोघांच्या फोटोवर चाहते घायाळ होतात. पण आता शाहिदची एक इंस्टाग्राम पोस्ट चर्चेचा विषय ठरलीये. शाहिदने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या बायकोसोबत कॅमेरासाठी पोज दिली आहे. पण त्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. त्याने त्याच्या बायकोलाच पुन्हा एकदा लग्नासाठी प्रपोज केलं आहे. शाहिदने मीरा सोबतच्या या फोटोला “मुझसे शादी करोगी मीरा कपूर” असं कॅप्शन दिलं आहे. त्याचा हा फोटो आणि कॅप्शन सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी अलिकडेच प्रसिद्ध डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांच्या स्टार-स्टडेड लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नात हे दोघे पारंपरिक पण स्टाईलिश पेहरावात दिसले. आता शाहिदने त्याच्या बायकोलाच पुन्हा प्रपोज केलेलं पाहून चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. हेही वाचा - Kareena kapoor khan : ‘तू इतकंही वाईट खेळत नाहीस’ म्हणत करिनाने सैफला दिली कॉप्लिमेंट; चाहते म्हणाले ‘कपल गोल्स’ मध्यंतरी शाहिदने कॉफी विथ करण मध्ये हजेरी लावली होती तेव्हा त्याने त्याची बायको मीरा त्याचसाठी किती महत्वाची आहे ते काबुल केलं होतं. ‘मीरा आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं.’ असं तो म्हणाला होता. आता या दोघांच्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत प्रेम दर्शवलं आहे. दरम्यान, शाहिदने 2015 मध्ये मीरासोबत लग्नगाठ बांधली. 26 ऑगस्ट 2016 रोजी त्यांची मुलगी मिशा कपूर या जगात आली आणि ते पालक बनले. यानंतर 5 सप्टेंबर 2018 रोजी मुलगा झैन कपूरच्या जन्माने त्यांचं छोटं कुटुंब पूर्ण झालं. शाहिद आणि मीरा आपल्या मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवण्यास प्राधान्य देतात मात्र त्यांची झलक सोशल मीडियातून पहायला मिळतेच.