JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मीरा राजपूतला शॉर्ट ड्रेसमध्ये पाहून शाहिदने विचारला भलताच सवाल, फोटोपेक्षा कमेंटचीच चर्चा

मीरा राजपूतला शॉर्ट ड्रेसमध्ये पाहून शाहिदने विचारला भलताच सवाल, फोटोपेक्षा कमेंटचीच चर्चा

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Mira Rajput ) ही जोडी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मीरा बॉलीवूडशी संबंधित नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.मीराच्या लेटेस्ट फोटोवर तिचा नवरा शाहिद कपूरने कमेंट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 डिसेंबर - शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Mira Rajput ) ही जोडी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मीरा बॉलीवूडशी संबंधित नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मीरा-शाहिदची परफेक्ट जोडी मानली जाते. लव्ही-डव्ही या जोडप्याला मीशा आणि झैन ही दोन सुंदर मुले आहेत. दोन मुलांची आई असली तरी मीरा तिच्या फिटनेस आणि स्टाईलने चाहत्यांचे नेहमी लक्ष वेधून घेते.मीराचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. याच कारणामुळे मीराचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा चर्चेत येतात. मीराच्या लेटेस्ट फोटोवर तिचा नवरा शाहिद कपूरने कमेंट केली आहे. या फोटोपेक्षा त्याच्या कमेंटची चर्चा रंगलेली आहे. मीराने शेअर केला सुंदर फोटोमीरा राजपूतने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती फ्लोरल प्रिंटचा ड्रेस परिधान करून आरशात पोज देताना दिसत आहे. स्नीकर्स आणि काळ्या रंगाच्या स्लिंग बॅगने तिचा लुक पूर्ण केला. आरशातही मीराची प्रतिमा दिसते आहे. मीराने तिचा हा मनमोहक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये फक्त ‘हॅलो’ लिहिले आहे. बायकोचा हा शॉर्ट ड्रेसमधला फोटो पाहून कमेंट करण्यापासून शाहिद स्वतःला रोखू शकला नाही. सध्या त्याच्या कमेंटची जोरदार चर्चा रंगलेली आहे. वाचा - अभिनेते मिलिंद गुणाजी झाले सासरे; मालवणच्या मंदिरात पार पडलं मुलाचं लग्न! मीराच्या या पोस्टवर शाहिदने कमेंट करत लिहिले आहे की, ‘तुला आवज येतोय का ?’. शाहिदच्या या कमेंटला चाहते उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. एकाने म्हटलं आहे ‘नाही ओ, आवाज येत नाही’ त्यानंतर दुसऱ्याने म्हटलं आहे, ‘सर मीरा सगळ्यांना रिप्लाय देत नाही आणि सगळ्यांचे ऐकत देखील नाही’ अशी मजेशीर कमेंट लिहिली. त्याचवेळी एकाने ‘माईक टेस्टिंग 1,2, 3 हॅलो मीरा’ असे लिहिले. इतकेच नाही तर मीराचे चाहते शाहिदसमोर मीराचे कौतुक करताना दिसत आहेत. एकाने लिहिले आहे की, ‘तुझी पत्नी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे’.

संबंधित बातम्या

शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या मीरा राजपूतने इन्स्टा स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘जर्सी’ 31 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पंकज कपूर आणि मृणाल ठाकूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्ननुरी यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या