Shahid Kapoor
नवी दिल्ली, 24 जानेवारी: बॉलिवूड क्युट कपलपैकी एक कपल म्हणजे अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput). शाहीदची पत्नी चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी, तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मीरा राजपूत ही बॉलिवूडमधली सगळ्यात लोकप्रिय स्टार वाईफ्समधील एक आहे. लाइमलाइटपासून दूर असली तर लाखोंच्या संख्येने तिचे चाहते आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टसाठी तिचे चाहते उत्सुक असतात. मीराला इंस्टाग्रामवर 3.3 मिलियन लोक फॉलो करतात, त्यामुळेच तिच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मीरा सोशल मीडियावर (Mira Rajput Instagram) नेहमी अक्टिव्ह असते. अनेक व्हिडीओ, फोटो पोस्ट करत शाहीदच्या चाहत्यासोबत दोघांच्या खासगी आयुष्यातील काही किस्से शेअर करत असते. दरम्यान, आता ही तिने एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये दोघे खूप रोमँटिक मूड मध्ये दिसत आहेत. तिने दोघांचा बेडरुममधील मिरर सेल्फी शेअर केला आहे. शाहिद आणि मीरा यांचा लिपलॉक करताना हा फोटो खुद्द मीराने शेअर केला आहे.
फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे या फोटोमध्ये मीरा आणि शाहिदचे चेहरे दिसत नाहीत, हा फोटो शेअर करत मीराने ‘संडे बिंजे’ या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. चाहतेही त्यांच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. मीरा आणि शाहिदच्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत. दोघांनाही एक मुलगी ‘मिशा’ आणि एक मुलगा ‘जैन’, अशी दोन अपत्ये आहेत. शाहिद एक परिपूर्ण फॅमिली मॅन आहे. मीरा नेहमी तिच्या स्टायलिश अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत येत असते.