JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शेवटी आईच काळीज! Aryan Khan साठी गौरी बर्गर घेऊन पोहोचली, पण...

शेवटी आईच काळीज! Aryan Khan साठी गौरी बर्गर घेऊन पोहोचली, पण...

एनसीबीने (ncb latest news) मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर टाकलेल्या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan Son) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) आणखी 12 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जाहिरात

शेवटी आईच काळीज; भुकेल्या मुलासाठी गौरी खान पोहोचली बर्गर घेऊन , पण...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 ऑक्टोबर: एनसीबीने (ncb latest news) मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर टाकलेल्या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan Son) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) आणखी 12 लोकांना ताब्यात घेण्यात आले. आर्यनला जामीन मिळण्यासाठी शाहरुखचे प्रयत्न सुरू असून आर्यनला येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कोठडीत आर्यनला काही नीट जेवायला मिळत नसणार या काळजीपोटी आई गौरी खान थेट त्याच्यासाठी बर्गर घेऊन गेल्याचे (mother gauri khan takes him burgers) समोर आले आहे. मात्र, एनसीबीने आर्यनला मेसचेच जेवण दिले. आर्यन खानला येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे तो एनसीबीच्या कोठडीत काय जेवत असेल? अशी काळजी लागून राहिलेल्या गौरी खान मुलासाठी काही बर्गर घेऊन गेली. मात्र, एनसीबीने विनम्रपणे गौरीची ही विनंती नाकारली आणि सुरक्षा कारणास्तव यासाठी नकार दिला. ज्याप्रमाणे त्यांनी इतर आरोपींना कोठडीत असताना घरगुती जेवणास नकार दिला त्याच प्रमाणे त्यांनी गौरीला ही नकार दिला. हे वाचा-  आर्यन खानला ताब्यात घेणारा निघाला भाजपचा कार्यकर्ता,भानुशालीचा कबुलीनामा 7 तारखेपर्यंत आर्यन खान कस्टडीमध्ये एनसीबीनं या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Bollywood actor Shah Rukh Khan’s son) आठ जणांना रविवारी अटक करण्यात आली. आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर आर्यनसह इतर सात आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. एनसीबीनं 13 ऑक्टोबर पर्यंत आर्यनची कस्टडी मागितली होती. मात्र आता कोर्टाने 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबीला आर्यनची कस्टडी दिली. आर्यन खानसह अन्य तीन आरोपींना सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. काय घडलं होतं नेमकं? एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. हे वाचा-  Hotness Alert! अभिनेत्री काजोलच्या बहिणीने BIKINI मध्ये केला योगा या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले. एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. NCB ने ही ड्रग्स पार्टी उधळून लावली. NCB चे पथक मागील 20 दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते. शनिवारी एनसीबीने मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर (CRUISE SHIP) सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. NCB नं प्रवासी म्हणून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी क्रूझ Cordelia मध्ये जाऊन सीक्रेट ऑपरेशन केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या