शाहरुख खान
मुंबई, 20 डिसेंबर : शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे पहिले गाणे समोर आल्यापासून शाहरुख-दीपिका पदुकोणचा चित्रपट वादात सापडला आहे. आता ‘झूम जो पठाण’ चित्रपटाचे दुसरे गाणेही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख त्याच्या चित्रपटाच्या वादावर सर्वत्र उघडपणे बोलत आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही आले आहेत. या वादादरम्यान आता शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो धर्माबद्दल बोलताना दिसतोय. एकीकडे नुकतंच शाहरुखच्या वैष्णोदेवीच्या दौऱ्यावरून त्याच्यावर टीका होत असताना दुसरीकडे धर्माबद्दल शाहरुखने केलेलं हे विधान आता व्हायरल होत आहे. नक्की काय म्हणाला होता शाहरुख पाहा. सध्या शाहरुखच्या धर्माबद्दलचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या एका जुन्या मुलाखतीतील आहे. या मुलाखतीत शाहरुख खानला धर्माशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने सर्वांची मनं जिंकली आहेत. यापूर्वी कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखने आपल्या बोलण्यातून चाहत्यांना वेड लावले होते. आपल्या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना त्याने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्याचदरम्यान आता त्याचा एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तो धर्मवर टिपण्णी करत आहे. हेही वाचा - Kiara-Sidharth Wedding: ‘मी याच वर्षी लग्न…’ कियारा सोबत लग्नाच्या चर्चांवर शेवटी बोललाच सिद्धार्थ मल्होत्रा शाहरुखचा हा व्हिडीओ एका जुन्या मुलाखतीतला आहे. या मुलाखतीत त्याला विचारलं गेलं की जर तो हिंदू असता तर त्याचं नाव दुसरं काहीतरी असतं, तेव्हा त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी वेगळ्या असत्या का? “तू एक चांगला मुस्लीम आहेस. पण जर तुझं नाव एसके वरून शेखर कृष्ण असतं तर…’’ यावर शाहरुख मध्येच बोलतो की, ‘‘शेखर कृष्ण नाही .. एसआरके म्हणजे शेखर राधा कृष्ण.’’ या उत्तराने शाहरुख उपस्थितांची मनं जिंकतो.
शाहरुख पुढे म्हणाला, ‘‘जर तो हिंदू असता किंवा त्याचे नाव शाहरुख खान ऐवजी शेखर राधा कृष्ण असते तर आजही तो शाहरुखसारखा असता.’’ तो म्हणतो, ‘मला वाटत नाही कीत्याने काही फरक पडला असता. कलाकार कुठल्याही धर्माचा असला तरी त्यांचे काम तुम्हाला किती आवडते हे महत्त्वाचे आहे. मला कोणत्याही नावाने हाक मारली तरी मी तितकाच गोड असेन.’’ असं उत्तर शाहरुख देतो.
या प्रश्नाचे शाहरुखने हसतमुखाने इतके सुंदर उत्तर दिले की उपस्थित त्याचे चाहते झाले आणि सर्वत्र फक्त टाळ्यांचा कडकडाट झाला. सध्या शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्याचा अशा धर्माबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही मुलाखत जुनी असली तरी विषयामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. शाहरुखची ही इंटरेस्टिंग स्टाईल लोकांना आवडली आहे.