अभिजीत बिचुकले
मुंबई, 28 डिसेंबर : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले कायमद वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. तो कधी काय आणि कोणाविषयी बोलेल याचा काही नेमच नाही. अनेकदा अभिजीत त्याच्या वक्तव्यांमुळे अडचणींतही सापडला आहे. अशातच अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्यानं ‘पठाण’ सिनेमातील शाहरुख खान च्या लुकवरुन मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या अभिजीत बिचुकलेचं हेल वक्तव्य मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरत आहे. साताऱ्यामध्ये माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकलेनी मोठा दावा केला आहे. यावेळी बिचुकलेनी थेट शाहरुख खानच्या पठाणमधील लुकवर वक्तव्य केलं आहे. अभिजीत बिचुकले म्हणाला, ‘शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. ही एक सकारात्मक गोष्ट म्हटली पाहिजे. बिग बॉसमध्ये माझी अशीच हेअरस्टाईल होती. 1991 मध्ये मी लहान होतो तेव्हा संजूबाबा संजय दत्तचे लांब केस होते. मात्र, आता 2022 वर्षा जी स्टाईल आणली गेली ती माझी आहे. मला वाटतं शाहरुख खानने माझ्यावेळीचे बिग बॉस पाहिलं असावं. सीझन 15 मध्ये काय दिवे लावले काय केलं हे शाहरुखने पाहिलं असावं. त्यामुळे शाहरुखने केलेली ही स्टाईल माझीच आहे.’ हेही वाचा - Video : चाहत्यांनी केला रश्मिका मंदानाचा पाठलाग; रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून अभिनेत्रीने केलं असं काही…. बिचुकलेच्या या मोठ्या दाव्यानं सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे. त्यानं शाहरुखविषयी केलेलं हे वक्तव्य चांगलंच ट्रेंड होत आहे. आता शाहरुख यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर चित्रपट ‘पठाण’ वादात आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील भगव्या बिकीनीमुळे हा संपूर्ण वाद उफाळला असून या चित्रपटाचा तीव्र निषेध केला जात आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. आत्तापर्यंत चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शीत झाली असून चित्रपटाच्या ट्रेलकडे किंग खानच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, शाहरुख दीपिकाचा ‘पठाण’ पुढच्या वर्षी 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र सध्या चित्रपट बॉयकॉटमध्ये अडकल्याचा दिसतोय. त्यामुळे याचा चित्रपटावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.