बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आईपणाचा आनंद घेत आहे.
आलियाने एका सुंदर मुलीला जन्म दिला असून तिचं नाव राहा आहे.
सध्या अभिनेत्री तिची मुलगी राहा कपूरसोबत वेळ घालवत आहे.
प्रेग्नेंसीनंतर आलिया स्वतःला फीट ठेवण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे.
आलिया भट्ट लवकरच कामावर परतणार आहे.
राहाच्या जन्मानंतर केवळ तीन महिन्यांनीच आलिया पुन्हा बॅक टू वर्क पहायला मिळणार आहे.
आलिया संजय लीला भन्साळीच्या 'बैजू बावरा' चित्रपटाचं शूटिंग सुरु करणार आहे.
आलिया आणि संजय लीला भन्साळीचा हा 2 दुसरा सिनेमा एकत्र असणार आहे.
आलिया पुन्हा चित्रिकरणासाठी परतणार म्हटल्यावर तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.