सुहाना- शाहरुख खान
मुंबई, 20 डिसेंबर : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान ची मुलगी सुहाना खान लवकरच अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ मधून ती बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात करणार आहे. नुकतेच तिने तिच्या या डेब्यू चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्याआधीच सुहाना खानचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. अलीकडेच सुहानाने तिच्या इंस्टाग्रामवर एका जर्नलचा फोटो शेअर केला आहे. पण खास गोष्ट म्हणजे हे जर्नल तिला वडील शाहरुख खान कडून भेट म्हणून मिळाले आहे. मुलगी सुहाना खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोवर शाहरुख खाननेची कमेंट लक्षवेधी ठरत आहे. सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अजून सुहाना अभिनय क्षेत्रात आली नसली तरीही तिचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत ती तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता सुहानाने नुकताच तिच्या डायरीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण या फोटोवर शाहरुख खानने कमेंट करत त्याने या डायरेक्ट सुहानासाठी काय लिहून ठेवलं आहे हे जाहीर केलं. हेही वाचा - SRK म्हणजे शेखर राधा कृष्ण…; पठाणच्या वादात शाहरुखचा तो व्हिडीओ व्हायरल सुहाना खानच्या या डायरीचं वैशिष्ट्य म्हणजे डायरी तिला शहरूखने दिली आहे. ह्या डायरीचे चार फोटो तिने पोस्ट केले आहेत. तिला फोटो त्या डायरीचा मुखपृष्ठ दिसत आहे. दुसरा फोटो या डायरीच्या पहिल्या पानाचा आहे. त्यावर सुहाना खानचं नाव लिहिलेलं असून ही डायरी शाहरुखने तिला दिली आहे हे स्पष्ट दिसत आहे. तर तिसरा फोटोमध्ये अभिनयाबद्दल असं हेडिंग लिहिलेलं एक कोरं पान दिसत आहे आणि चौथा फोटो २०१४ असं लिहिलेलं दिसत आहे. जर्नलचा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत सुहाना खानने तिची प्रेरणा असं म्हंटल आहे. या पुस्तकात शाहरुख खानने अभिनयाच्या नोट्स लिहिल्या आहेत. या जर्नलमध्ये शाहरुखने करियरदरम्यान ‘अभिनय’बद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.
जेव्हा जेव्हा आर्यन किंवा सुहाना त्यांच्या इंस्टाग्रामवर एखादे फोटो शेअर करतात तेव्हा शाहरुख खान त्यावर छान कमेंट करताना दिसतो. सुहानाने शेअर केलेल्या या फोटोंवर कमेंट करताना शाहरुख खानने लिहिले की, ‘‘मला अभिनयातलं जे कळत नाही ते मी त्या डायरीत लिहिलं आहे. म्हणजे तू ते शिकशील आणि मलाही शिकवशील.’’ सुहानाच्या या फोटोवर शाहरुखची ही कमेंट हिट ठरली असून सगळीकडे या कमेंटची जोरदार चर्चा होत आहे.
सुहाना येणाऱ्या काळात अनेक स्टारकिड्ससोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे तर शाहरुखचा लेक आर्यन अभिनेता नाही तर दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.