सुशांतशी ब्रेकअप ते विकी जैनशी लग्न नेहमी चर्चेत राहिली अंकिता

 पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे पदार्पणापासून कायम चर्चेत राहिली आहे.

तिने गेल्या वर्षी 14 डिसेंबरला विकी जैनसोबत लग्न केले.

 अंकिताच्या आयुष्यात विकीच्या आधी अभिनेता सुशांत सिंग राजपूत होता.

अंकिता आणि सुशांत जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र, 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले.

ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडेच्या आयुष्यात विकी जैनची एन्ट्री झाली.

विकी आणि अंकिताची भेट एका मैत्रिणीच्या पार्टीत झाली होती.

अभिनेत्रीने 2018 मध्ये विकीसोबतच्या तिच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले.

 14 डिसेंबरला अखेर विकी आणि अंकिता लग्नबंधनात अडकले.

लग्नानंतर अंकिता लोखंडे आणि विकी जैनचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात.