जवान
मुंबई, 06 मे : वर्षातील सर्वात मोठा पॅन-इंडियन चित्रपट म्हणजे शाहरूख खानचा जवान हा चित्रपट आहे. शाहरुखच्या या चित्रपटाची चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे. एटली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहरुख सहित नयनतारा, विजय सेतुपति, दीपिका पादुकोण हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. एवढ्या मोठ्या स्टारकास्टने सजलेला हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा आधी 2 जूनला प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारीख नुकतीच समोर आली आहे. जवान हा सिनेमा लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शाहरुखचा हा सिनेमा आता येत्या 07 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तब्बल तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आला आहे. शाहरुख खानने एक जबरदस्त टिझर शेअर करत या सिनेमाची नवीन रिलीज डेट चाहत्यांना सांगितली आहे. त्यामुळे शाहरुखचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना आता अजून प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित.
शाहरुख व्यतिरिक्त या चित्रपटात तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन देखील दिसणार असल्याचे नुकतेच समोर आले आहे. सुरुवातीला, तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनने चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याची ऑफर नाकारली होती अशा अफवा होत्या. पण, एका रिपोर्टमध्ये हे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच पुष्पा स्टार अल्लू अर्जुनने जवळजवळ एक महिन्यापूर्वी मुंबईत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तो या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सगळीकडे पसरलेली बर्फाची चादर, -15 अंश सेल्सिअस तापमान अन अभिनेत्रीने बिकिनीत केला असा कारनामा विशेष म्हणजे जवान या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यानं त्याचा फटका इतर सिनेमांना बसणार आहे. त्यामुळे जवळपास सहा सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा आता बदलाव्या लागणार आहेत. यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा बडे मियाँ छोटे मियाँ सिनेमाही सामील आहे. या सिनेमाच्या प्रदर्शाची तारीख ही बदलण्यात आली आहे. आता हा सिनेमा 2024 मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. तसेच रणबीर कपूरचा ऍनिमल, सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा या देखील सिनेमांच्या रिलीज डेट बदलण्यात आल्या आहेत.
पठाण सिनेमाला घवघवीत यश मिळाल्यानंतर आणि किसी का भाई किसी की जान सिनेमा अपयशी ठरल्यानंतर सर्वांच्या अपेक्षा जवान सिनेमावर आहेत. पठाणने जागतिक स्तरावर रु. 1,050 कोटी कमावले आहेत. त्यानंतर जवान हा या वर्षातील शाहरुखचा दुसरा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरणार का हे पाहणं महत्वाचं आहे. रिपोर्ट्सनुसार, जवान हा एका व्यक्तीची कथा आहे, जो सामाजिक चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याने वर्षांपूर्वी घेतलेले वचन पूर्ण करतो. या जवान सिनेमात शाहरुख पुन्हा एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.