मुंबई, 05 मार्च : ‘शाळा’ आणि ‘फुंतरू’ या सिनेमांचा दिग्दर्शक सुजय डहाकेचा ‘केसरी’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. मात्र हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर एक नवा वादही मराठी सिनेसृष्टीत सुरू झाला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या आधी दिलेल्या एका मुलाखातीत त्यानं सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न केला होता. ज्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं आहे. मराठी सिने इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखलेनंही जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके… आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुमची लायकी नाही. पुन्हा या प्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी.’ ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका…’ मालिका वादात शशांक केतकरची उडी
सौरभ गोखलेच्या या पोस्टवर इतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. याशिवाय अभिनेता शशांक केतकरनं सुद्धा त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट लिहून सुजय डहाकेवर टीका केली आहे. शशांकनंही ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. असा सूचनावजा सल्ला दिला आहे. तसेच अभिनेत्री तेजश्री प्रधाननंही सुजयचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे. मालिकांमधील वादावर भडकली तेजश्री प्रधान, म्हणाली ‘मी ब्राह्मण नाही पण मला…’
‘केसरी’ सिनेमाचा दिग्दर्शक सुजय डहाके यानं लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत मराठी मालिकांमध्ये सर्व ब्राह्मण मुलीच दिसतात इतर मराठी मुली का नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्या वक्तव्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.मात्र या ‘सोशल वॉर’वर अद्याप सुजयनं मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दिल्ली हिंसाचारावर रितेश देशमुखचा TikTok Video, असं काही म्हणाला की…