JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ''यावर्षी आमचं ‘कॅलेंडर’ हरवलं यार..'' सतीश यांचा फोटो शेअर करत मराठी अभिनेता झाला भावुक

''यावर्षी आमचं ‘कॅलेंडर’ हरवलं यार..'' सतीश यांचा फोटो शेअर करत मराठी अभिनेता झाला भावुक

मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेने देखील सतीश कौशि्क यांचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मार्च, हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं गुरुवारी पहाटे वयाच्या 66 व्या वर्षी मुंबईत निधन झालं आहे. त्यांचे जवळचे मित्र, अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. सतीश यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. मराठमोळा अभिनेता  कुशल बद्रिकेने देखील सतीश यांचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी अभिनित ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात सतीश कौशिक यांनी ‘कॅलेंडर’ ही भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती. आजही सतीश कैशिक म्हटलं की मिस्टर इंडिया’ मधील ‘कॅलेंडर’ चा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. वाचा- 2 दिवसापूर्वी कलाकारांसोबत होळी खेळले अन् आता अचानक निधन, प्रसिद्ध अभिनेता हरपला आज त्यांच्या जाण्यानंतर अभिनेता कुशल बद्रिकेनं याचं ‘कॅलेंडर’ ची आठवण करत एक फोटो शेअर केला आहे. सोबतच एका ओळची पण तितकीच भावुक करणारी अशी पोस्ट लिहिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, या वर्षी आमचं calendar हरवलं यार. 😒 कुशलच्या या पोस्टनंतर सेलेब्ससोबत चाहत्यांनी देखील सतीश कौशिक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

संबंधित बातम्या

आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने सतीश कौशिक यांनी भूमिका गाजवल्या. अभिनेता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून देखील त्यांनी अनेक दमदार चित्रपट दिले. मात्र, अभिनेता म्हणून ते नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. त्यांनी मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. यातील काही पात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.

सतीश कौशिक हे केवळ अभिनेते नाही तर दिग्दर्शक आणि लेखकही होते.. ‘जाने भी दो यारो’साठी त्यांनी मजेदार डायलॉग लिहिले. तर दिग्दर्शक म्हणून त्यांचा ‘रुप की रानी चोरो का राजा’ हा पहिलाच चित्रपट होता जो सुपरहिट ठरला. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडियाचा ‘कॅलेंडर’ आणि दीवाना मस्तानाचा ‘पप्पू’ या भूमिकांमुळे ओळखले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या