JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / '' ...म्हणून आम्हांला आई बडवायची'', हेमांगी कवीनं सतीश कौशिक यांना सांगितला होता बालपणीचा 'तो' किस्सा

'' ...म्हणून आम्हांला आई बडवायची'', हेमांगी कवीनं सतीश कौशिक यांना सांगितला होता बालपणीचा 'तो' किस्सा

सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडियाचा ‘कॅलेंडर’ आणि दीवाना मस्तानाचा ‘पप्पू’ या भूमिकांमुळे ओळखले जाते. त्यांच्या याच ‘कॅलेंडर’ विषयी अभिनेत्री हेमांगी कवीनं बालपणीची एक आठवण शेअर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मार्च, , हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं गुरुवारी पहाटे वयाच्या 66 व्या वर्षी मुंबईत निधन झालं आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने सतीश कौशिक यांनी भूमिका गाजवल्या. अभिनेता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून देखील त्यांनी अनेक दमदार चित्रपट दिले. मात्र, अभिनेता म्हणून ते नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडियाचा ‘कॅलेंडर’ आणि दीवाना मस्तानाचा ‘पप्पू’ या भूमिकांमुळे ओळखले जाते. त्यांच्या याच ‘कॅलेंडर’ विषयी अभिनेत्री हेमांगी कवीनं बालपणीची एक आठवण शेअर केली आहे. विशेष म्हणजे तिनं तिच्या बालपणीचा हा किस्सा सतीश कौशिक यांना देखील सांगितला होता. हेमांगी कवीनं सतीश कौशिक यांचा तारूण्यातील एक फोटो शेअर केला आहे. सोबत हेमांगी लिहिते की, लहानपणी आईने थोडा उशीर केला जेवण वाढायला की समोरचं ताट हातात घेऊन ते Glass ने बडवत “Calendar खाना दो” मोठमोठ्याने म्हणायचं. मग आई “असं ताट वाजवू नये” म्हणून आम्हांला बडवायची. पण आम्ही कुठे ऐकतोय तिचं. ती जी सवय लागली ती आजतागायत. काय गंमत होती किंवा आहे त्यात कुणास ठाऊक. वाचा- निना गुप्तांवर प्रेम, मुलाचा मृत्यू आणि इतक्या कोटींची संपत्ती; असं होतं आयुष्य तुमच्या सोबत काम करताना मी हा किस्सा तुम्हांला सांगितला तेव्हा तुम्ही हसून म्हणालात, “80-90s के हर बच्चे की यही कहानी है!”८०-९० च्या दशकातल्या मुलांचं बालपण तुमच्या Calender ने समृद्ध केलंय आणि मनात Tick ही करून ठेवलंय कायमचं!असं म्हणतात जुनं calendar घरात ठेऊ नये पण हे Calendar मनाच्या भिंतीवर, आठवणींच्या खिळ्याला सदा अडकवलेलं राहील!It was pleasure working with you Satish ji!#SatishKaushik #सतीशकौशिक #Calender #gonetooearly 🙏🏽😔

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी अभिनित ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात सतीश कौशिक यांनी ‘कॅलेंडर’ ही भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती. सतीश कौशिक हे केवळ अभिनेते नाही तर दिग्दर्शक आणि लेखकही होते.. ‘जाने भी दो यारो’साठी त्यांनी मजेदार डायलॉग लिहिले. तर दिग्दर्शक म्हणून त्यांचा ‘रुप की रानी चोरो का राजा’ हा पहिलाच चित्रपट होता जो सुपरहिट ठरला.

सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. सतीश यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन मनोरंजन विश्वातील कलाकारांनी दु: ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनुपम खेर यांच्यापासून कंगना, रितेश देशमुख व मधुर भंडारकर यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या